Ad Advertisement Ad Advertisement

Frogless Pond Mystery : या तळ्यात आजही ऐकू येत नाही बेडकांचा आवाज

जगातील एका अनोख्या तळ्याशी जोडलेले हे रहस्य आजही चर्चेचा विषय आहे; या ठिकाणी बेडूक असूनही त्यांचा आवाज का ऐकू येत नाही?

Frogless Pond Mystery तिरुवनंतपुरम : बऱ्याच ठिकाणी लहान-मोठे तलाव असतात. या तलावांमध्ये बेडूक हा एक महत्त्वाचा प्राणी हमखास दिसतोच. मात्र, केरळमध्ये अशीही काही तळी आहेत जिथे बेडूक अजिबात आढळत नाहीत. अशाच एका बेडूक नसलेल्या तळ्याविषयी माहिती जाणून घेऊया.

केरळच्या तिरुवनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांच्या सीमेवरील ओयूर गावात एक तलाव आहे, जिथे बेडूक अजिबात आढळत नाहीत. या ऐतिहासिक तलावाला माक्रीइल्लाकुलम (Makriyillakulam) म्हणजेच बेडूक नसलेले तळे म्हणून ओळखले जाते. हे तळे मारुथमोनपल्ली (Maruthamonpally) येथे वसलेले आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे की, इथे बेडूक राहत नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. समाजसुधारक पी. कृष्णा पिल्लई यांनी त्यांच्या माक्रीइल्लाकुलम (Makriyillakulam) नावाच्या कादंबरीत या तलावाशी संबंधित दंतकथा आणि ऐतिहासिक महत्त्वाची माहिती दिली आहे.

अशी आहे दंतकथा

फार पूर्वी या तलावाजवळ अकावूर माना नावाचा एक मठ होता. या मठातील साधू दररोज तलावाच्या काठावर सूर्य नमस्कार आणि ध्यानधारणा करत असत. मात्र, बेडकांच्या सततच्या डराव डराव करण्यामुळे त्यांच्या साधनेत व्यत्यय येत होता. बेडकांच्या या त्रासाला कंटाळून अखेर साधूंनी तलावातील बेडकांना शाप दिला की, ते सर्व नष्ट होतील. हीच दंतकथा या बेडूक नसलेल्या तलावाविषयी सांगितली जाते.

या दंतकथेमागील सत्य शोधण्याचा कोणी फारसा प्रयत्न केला नसला तरी, स्थानिक लोक आजही सांगतात की, या तळ्यातत बेडूक नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकू येत नाही. हे एक न उलगडलेलं कोडे आजही कायम आहे.

The Theft of the Western Star : वेस्टर्न स्टारची चोरी !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.