मुंबईतील विशेष सोहळ्यात साई पल्लवी, यश आणि नितेश तिवारीही उपस्थित; ‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार
मुंबई : Ranbir Kapoor बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शनिवारी मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि दिग्दर्शक नितेश तिवारी पुन्हा एकत्र आले. मात्र, अमेरिकेतील प्रसिद्ध यूट्यूबर MrBeast याच्या अचानक झालेल्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली. या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी MrBeast सोबत छायाचित्र काढले. हे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘रामायण’मध्ये कोण साकारणार कोणती भूमिका?
नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
लक्ष्मणाची भूमिका साकारण्याबाबत रवी दुबे यांनी यापूर्वी उत्साह व्यक्त केला होता. या चित्रपटाविषयी विचार करताना आपल्या मनात समर्पणाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले होते.
दिवाळीत चित्रपटगृहांत येणार ‘रामायण’
‘रामायण’ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने, आठ वेळा ऑस्कर पुरस्कार मिळवलेल्या डीएनईजी आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे. सोनी पिक्चर्स या चित्रपटाचे भारताबाहेरील वितरण करणार आहे.
‘रामायण’चा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
Read About : IIFA Awards 2027 : अबुधाबीत रंगणार आयफाचा झगमगता सोहळा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.