Ad Advertisement Ad Advertisement

Anil Kapoor Sunita Kapoor honeymoon story – अनिल कपूराच्या हनिमूनची भन्नाट गोष्ट’

तीच माझी क्वीन’ म्हणत पत्नी सुनीताबद्दल व्यक्त केलं प्रेम

मुंबई : Anil Kapoor Sunita Kapoor honeymoon story – अभिनेता अनिल कपूर याने आपली पत्नी सुनीता कपूर हिच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला आणि त्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतरच्या हनिमूनला सुनीता एकट्याच गेल्या होत्या, असा खुलासा अनिल कपूरांनी केला आहे.
हा किस्सा ‘इंडिया के टॉप १% : द अनिल कपूर शो’च्या आगामी भागात ऐकायला मिळणार आहे.

हनिमूनला सुनिता एकटीच गेली

कार्यक्रमात एकट्याने प्रवास करण्याबाबत चर्चा सुरू असताना अनिल कपूरला सुनीता हिची आठवण झाली. त्यावेळी त्याने जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ”सुनीता हनिमूनला एकटीच गेली होती. मी तिच्यासोबत गेलो नव्हतो.” अनिल याच्या या विधानाने कार्यक्रमातही प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.

‘क्वीन’चा उल्लेख आणि पत्नीची आठवण!

या चर्चेदरम्यान कंगना रणौतच्या ‘क्वीन’ चित्रपटाचा संदर्भ आला. त्यावर अनिल कपूरने आपल्या पत्नीबद्दल प्रेमाने म्हटले,”सुनीताच माझी क्वीन आहे आणि कायम राहील.” एका साध्या चर्चेतून पत्नीबद्दलचा हा खास किस्सा अनिल यानी शेअर केला.

१९८४ पासून साथ कायम

अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांनी १९८४ मध्ये लग्न केले. या दोघांना सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशी तीन मुले आहेत. अनेक वर्षांच्या संसारानंतरही दोघांमधील नाते आणि त्यांच्यातील जिव्हाळा अनेकदा चर्चेत येतो. अनिल कपूरांनी सांगितलेला हा किस्साही त्यांच्या नात्यातील हलकाफुलका अंदाज दाखवणारा आहे.

पडद्यावर अनेक ‘क्वीन’, पण अनिल कपूरांसाठी खरी ‘क्वीन’ कोण?

कंगना रणौतच्या ‘क्वीन’चा संदर्भ आला आणि अनिल कपूरने उत्तरही दिले त्यांच्या आयुष्यातील खरी ‘क्वीन’ म्हणजे सुनीता कपूरच आहे. ‘इंडिया के टॉप १% : द अनिल कपूर शो’चा हा भाग या आठवड्याच्या शेवटी रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पाहता येणार असून, जिओहॉटस्टारवरही तो उपलब्ध असेल.

Juhu Beach Cleanup After Ganpati Visarjan – 2026 गणपती गेले, पण कचऱ्याचे काय?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.