Ad Advertisement Ad Advertisement

Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई

मेळ्यात १०० रुपयांच्या नोटा चालवताना अडकला जाळ्यात

राजकोट (गुजरात) : Rajkot Fake Currency गुन्हेगारी जगतात सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराचे एक धक्कादायक उदाहरण गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात समोर आले आहे. एका साध्या भाजी विक्रेत्याने चक्क इन्स्टाग्राम रील पाहून आणि टेलिग्राम च्या मदतीने घरातच बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकोट पोलिसांनी कारवाई करत या आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ६५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे.

अशी सुचली बनावट नोटांची कल्पना

पोलीस तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किशन सोलंकी असून, तो मांडा डुंगर परिसराचा रहिवासी आहे. किशन भाजी विकून आपला उदरनिर्वाह करायचा; परंतु त्याचे उत्पन्न कमी होते आणि त्याच्यावर कर्जही वाढले होते.
कमी वेळेत झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाने तो मोबाईलवर इन्स्टाग्राम रील पाहत असताना, त्याच्यासमोर १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा कशा तयार करायच्या, याविषयीची एक रील आली. त्याने लगेचच त्या रील बनवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांमध्ये टेलिग्रामवर चॅटिंग झाले आणि तेथून त्याने प्रिंटरच्या साहाय्याने बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले.

मेळ्यात चालवल्या बनावट नोटा; छपाईचे साहित्य जप्त

किशनने या ऑनलाईन ट्रेनरला फी म्हणून १० हजार रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या, ज्याच्या बदल्यात ट्रेनरने त्याला ३ हजार रुपयांची खरी रोकड पाठवली होती. बाजारात कोणाला संशय येऊ नये म्हणून किशनने सुरुवातीला मोठ्या नोटा न वापरता, जन्माष्टमीच्या मेळ्यात १०० रुपयांच्या बनावट नोटा वापरून साहित्य खरेदी केले. १०० रुपयांची नोट असल्याने दुकानदारांनीही त्यावर जास्त संशय घेतला नाही. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे

१०० रुपयांच्या २१६ बनावट नोटा
५०० रुपयांच्या ३ बनावट नोटा
एक सीपीयू आणि मॉनिटर
दोन प्रिंटर आणि एक लॅमिनेटर हीटर मशीन
बटर पेपर आणि नोटा छापण्यासाठी लागणारा विशेष कागद

Read About : Cryonics Mumbai Case – भविष्यात जिवंत होण्याच्या आशेने मुंबईतील कुटुंबाने 4 वर्षे मृतदेह ठेवला फ्रीझरमध्ये
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.