Ad Advertisement Ad Advertisement

Truck Bike Accident – ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार

काळाचा घाला। मालदाभाडीजवळील घटना; २ पुरुष, एका महिलेसह ३ मुलांचा समावेश

जामनेर : Truck Bike Accident ट्रक व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच दुचाकीवर बसलेले २ पुरुष, १ महिला, २ लहान मुली व एक ८ महिन्यांचा मुलगा असे एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जामनेर ते बोदवड रोडवरील मालदाभाडी गावाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टोमॅटोने भरलेला ट्रक (एचआर- ५५, ऐके- ५२३२) हा जामनेर शहराकडून बोदवडकडे जात होता. तर, चंपालाल रेवलसिंग भिलाले हा आपल्या पल्सर कंपनीच्या दुचाकी (एमपी- ६८, झेडएफ- ३३४०) वर सहा जणांना बसवून मध्य प्रदेशातील शहापूर येथून बोदवड मार्गे जामनेरकडे येत होता. या दोन्ही वाहनांमध्ये जामनेर ते बोदवड रोडवरील मालदाभाडी गावाजवळील एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीवरील सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली.

अपघातातील मयतांमध्ये मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील मालची तांडा येथील राहणाऱ्या चंपालाल रेवलसिंग भिलाले (२८), रामा सुरशिंग भिलाले (२६), शिमला रामा भिलाले (२२), पुज्या रामा भिलाले (५), भरती रामा भिलाले (३), श्रवण रामा भिलाले (३ महिने) यांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांसह पोलिसांनी सर्व मयत व्यक्तींना शवविच्छेदन करण्यासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात.

ट्रक चालकासह क्लिनर फरार

मयत चंपालाल भिलाले हे आपल्या दुचाकीवरून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आपल्या कुटुंबासह मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर ट्रकचा चालक व क्लिनर फरार झाले आहेत, तर अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

परिसरात शोककळा

अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांच्या मृत्यूची माहिती मालदाभाडीसह जामनेर व बोदवड तालुक्यांत मिळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने मध्य प्रदेशातील मांडवी तांडा येथील भिलाले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Read About : Yemen Palace Explosion – येमेनमध्ये सरकारी राजवाड्याजवळ स्फोट; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
E-Paper: Punyanagari E-Paper

महत्त्वाचे मुद्दे

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.