Why Doctors Wear Green and Blue मुंबई : हॉस्पीटल मध्ये गेल्यावर तुमची नजर डॉक्टरांच्या पोशाखाकडे गेलीच असेल. येथील आयुसीयु तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये बहुतांश डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या विशेष पोशाखात दिसतात. डॉक्टर असा रंगाचा पोशाख का परिधान करतात याविषयी जाणून घेऊया.
एखाद्या रंगाकडे एकसारखे बघितले तर तेव्हा डोळ्यांना थकवा जाणवतो. तसेच सूर्याकडे किंवा एखाद्या चमकदार गोष्टीकडे बघितल्यावर डोळे चमकतात. अशात जर तुम्ही लगेच हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे पाहिले तर डोळ्यांना आराम मिळतो. आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या डोळ्यांना थकवा येऊ नये आणि सर्जरी दरम्यान कोणतीही गडबड होऊ नये असे असते.
तसेच या रंगाचे कपडे घालण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे मनुष्यांच्या डोळ्यांची रचना अशी आहे की, ते लाल, हिरवा आणि निळा रंग सहजपणे म्हणजे कोणत्याही त्रासाशिवाय बघू शकतात. पण बाकीचे रंग सूर्यप्रकाशासोबत मिळून एक वेगळा रंग तयार करतात. हेच कारण आहे की, तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळे आर्टिफिशिअल लाइट बघितले असतील, जेणेकरून डॉक्टर किंवा नर्सना भ्रम होऊ नये.
Read About : Restaurant Hygiene : हॉटेलच्या टॉयलेटमध्ये धुतली जात होती जेवणाची भांडी; प्रशासनाची नोटीस
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.