Ad Advertisement Ad Advertisement

Restaurant Hygiene : हॉटेलच्या टॉयलेटमध्ये धुतली जात होती जेवणाची भांडी; प्रशासनाची नोटीस

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; अन्न सुरक्षा विभागाचा छापा, स्वच्छता सुधारण्याचे आदेश

कोरबा : Restaurant Hygiene छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एका लोकप्रिय रेस्टॉरंटचा अत्यंत किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निहारिका परिसरातील प्रसिद्ध न्यू दिल्ली स्वीट्स या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी जेवण बनवण्याची आणि मिठाईची मोठी भांडी थेट शौचालयात धुतली जात असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारानंतर अन्न सुरक्षा विभागाने रेस्टॉरंटला नोटीस बजावली आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, रेस्टॉरंटचा एक कर्मचारी टॉयलेटच्या अत्यंत अस्वच्छ फरशीवर बसून मोठी भांडी धुताना पकडला गेला आहे. हॉटेलात आलेल्या एका सजग ग्राहकाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करून जाब विचारला. त्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या २-३ दिवसांपासून पाणीपुरवठ्याची समस्या असल्याने नाईलाजास्तव येथे भांडी धुवावी लागत असल्याचे अजब आणि उडवाउडवीचे समर्थन केले.

या घटनेची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी विकास भगत यांच्या पथकाने तातडीने हॉटेलवर छापा टाकला. प्रशासनाने रेस्टॉरंटच्या मालकाला कारणे दाखवा नोटीस जारी केली असून पुढील २ ते ३ दिवसांत स्वच्छतेची व्यवस्था पूर्णपणे सुधारण्याचे आदेश दिले आहेत.

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.