सुमारे १,५०० कामगारांना सुरक्षित बाहेर काढले, कोणतीही जीवितहानी नाही
मुंबई – Mulund Fire मुंबईतील मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी/टाटा नगर परिसरात एका बांधकाम साइटवर कामगारांच्या तात्पुरत्या घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन इमारतीचे काम सुरू आहे. तेथील साईटवर काम करणाऱ्या कामगारांची येथे राहण्याची सोय करण्यात आली होती.
या आगीदरम्यान कामगारांच्या शेडमध्ये ठेवलेल्या ७ एलपीजी गॅस सिलिंडरचा एकापाठोपाठ एक प्रचंड स्फोट झाला. या स्फोटांमुळे आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे मोठे लोळ हवेत उडाले.
सुमारे १,५०० कामगार सुखरूप
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेले नाही. सिलिंडरचे स्फोट होण्यापूर्वीच लेबर कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे १,५०० कामगारांना वेळेत आणि सुखरूपपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर आणि नवघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांतच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत कामगारांचे राहण्याचे शेड आणि त्यांचे वैयक्तिक साहित्य जळून खाक झाले असून आर्थिक नुकसान झाले आहे.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.