Ad Advertisement Ad Advertisement

Dark Energy May Be Changing – विश्वाचा पसारा सतत वाढविणारी रहस्यमय ‘डार्क एनर्जी’ अस्थिर?

३,००० स्फोट पावणाऱ्या ताऱ्यांच्या अभ्यासातून समोर आला थक्क करणारा पुरावा!

वॉशिंग्टन : ​Dark Energy May Be Changing – आपले अथांग विश्व सतत पसरत चालले आहे, हे तर आपल्याला माहीत आहे. पण हा विस्तार ज्या अज्ञात शक्तीमुळे होत आहे, ती शक्ती ‘स्थिर’ आहे का? की वेळोवेळी आपले रूप बदलत आहे? या प्रश्नाने सध्या संपूर्ण खगोलशास्त्र क्षेत्राला भंडावून सोडले आहे. जवळपास ३,००० स्फोटक ताºयांच्या अभ्यासावरून शास्त्रज्ञांना असे संकेत मिळाले आहेत की, विश्वाचा सतत विस्तार करणारी ही रहस्यमयी ‘डार्क एनर्जी’ स्थिर नसून कालांतराने बदलत असावी! ​हा निष्कर्ष जर सिद्ध झाला, तर आजवर विश्वाच्या विस्तारण्याबाबत मानल्या गेलेल्या नियमांना आणि सिद्धांतांना मोठी कलाटणी मिळू शकते.

​ऑस्ट्रेलिया क्वीन्सलँड विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने गेली ३० वर्षे घेतलेली खगोलीय निरीक्षणे एकत्र केली. त्यांनी तब्बल २,८८४ ‘टाइप आयए सुपरनोव्हा’ ताºयांचा एक विशाल संग्रह तयार केला. जेव्हा एखाद्या ताºयाचा प्रचंड स्फोट होतो, तेव्हा त्याला सुपरनोव्हा म्हणतात. ‘टाइप आयए’ या प्रकारच्या स्फोटक ताºयांची चमक ही जवळपास एकसारखीच असते. त्यामुळे अंतराळात प्रचंड अंतरावर असणाºया दीर्घिका किती दूर आहेत, हे मोजण्यासाठी शास्त्रज्ञ या ताºयांना अत्यंत विश्वासार्ह साधन मानतात.

​डार्क एनर्जी म्हणजे काय आणि काय बदलले?

​विश्व मागे खेचले जाण्याऐवजी अत्यंत वेगाने पसरत चालले आहे. या विस्तारामागे असणाºया अज्ञात आणि अदृश्य ताकदीला वैज्ञानिक ‘डार्क एनर्जी’ म्हणतात. आजवरच्या शास्त्रज्ञांच्या मानण्यानुसार ही ऊर्जा एकदम स्थिर आहे आणि तिच्यात कधीही बदल होत नाही. ​परंतु, या नव्या विश्लेषणाने सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. या निष्कर्षांनुसार डार्क एनर्जी काळासोबत बदलते आहे! म्हणजेच, विश्वाचा विस्तार नेमका कसा आणि कोणत्या वेगाने होतोय, याचे नियम आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक गुंतागुंतीचे आणि रहस्यमयी आहेत.

​जुन्या माहितीचे आधुनिक पद्धतीने पुनर्विश्लेषण

​संशोधकांनी केवळ नवीन डेटा गोळा केला नाही, तर गेल्या ३० वर्षांतील जुन्या निरीक्षणांची आधुनिक तंत्रज्ञानाने पुनर्तपासणी केली. ​अंतराळातील सूक्ष्म धूळ, ​दीर्घिकांचे अफाट वस्तुमान, ​प्रकाशाचे वळणे आदी ​या सर्व घटकांचा बारकाईने विचार केला गेला. तसेच, महाविस्फोटानंतरच्या अवशिष्ट प्रकाशाचा आणि दीर्घिकांच्या वितरणाचाही अभ्यास केला गेला. त्यामुळे विश्वाच्या विस्ताराचा इतिहास अधिक अचूकपणे उलगडण्यास मदत झाली.

​दुसरा स्वतंत्र पुरावाही मिळाला!

​विशेष म्हणजे, अमेरिकेतील डीईएसआय या एका वेगळ्या प्रकल्पाच्या निरीक्षणांमध्येही डार्क एनर्जी बदलत असल्याचे संकेत मिळाले आहेत. जरी या दोन्ही प्रयोगांचे निष्कर्ष तंतोतंत एकसारखे नसले, तरी दोन्ही प्रयोगांनी स्थिर डार्क एनर्जीच्या जुन्या कल्पनेला जोरदार आव्हान दिले आहे! ​हा निष्कर्ष अद्याप अंतिम मानला गेलेला नाही, तरीही इतक्या अथांग डेटावरून मिळालेले हे संकेत भविष्यातील मोठ्या क्रांतीची नांदी मानले जात आहेत. ​डार्क एनर्जीचे हे रहस्य उलगडले, तर केवळ विश्वाचा विस्तारच समजणार नाही, तर गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम भौतिकी या भौतिकशास्त्रातील दोन मोठ्या संकल्पना एकत्र कशा येतात, या जगातील सर्वात मोठ्या गूढ प्रश्नाचे उत्तरही मानवजातीला मिळू शकेल!

Read About : WASP-17b Atmosphere : जेम्स वेब टेलिस्कोपने उलगडले परग्रहाच्या वातावरणाचे त्रिमितीय रहस्य

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.