Ad Advertisement Ad Advertisement

Kriti Sanon Varun Dhawan Reunion – ‘भेडिया’ची जोडी पुन्हा एकत्र

क्रिती-वरुणच्या भेटीमागे दडलंय मोठं रहस्य?

मुंबई : Kriti Sanon Varun Dhawan Reunion – बॉलिवूडमध्ये एखादी लोकप्रिय जोडी पुन्हा एकत्र दिसली की चाहत्यांच्या अपेक्षांना लगेच पंख फुटतात. त्यात सोबत जुन्याच चित्रपटाचा दिग्दर्शक असेल, तर चर्चांना उधाण येणारच. असंच काहीसं घडलं आहे अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या पुनर्भेटीमुळे. ‘भेडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे हे तिघे पुन्हा एकत्र दिसले आहेत. विशेष म्हणजे, क्रितीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांना नव्या चित्रपटाची चाहूल लागली आहे.

क्रितीच्या एका पोस्टने वाढवलं कुतूहल

क्रितीने वरुण आणि अमर कौशिक यांच्यासोबतचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना एक खास संदेश दिला. ‘एक अनपेक्षित पुनर्भेट, जी तुम्हाला ऑब्सेस्ड करेल, पुढील माहितीसाठी तयार राहा’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण तिने उघड केलेलं नाही. त्यामुळे तिघे पुन्हा एखाद्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत की जाहिरात किंवा वेगळ्या प्रकल्पाची तयारी सुरू आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषत: ‘ऑब्सेस्ड’ या शब्दामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

पुन्हा अवतरणार का ‘भेडिया’ची जादू?

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात वरुणने भास्करची, तर क्रितीने डॉ. अनिकाची भूमिका साकारली होती. लांडग्याने चावा घेतल्यानंतर भास्करच्या आयुष्यात घडणाऱ्या विचित्र घटनांभोवती चित्रपटाची कथा फिरत होती. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी विश्वाचा भाग आहे. आता या तिघांच्या पुनर्भेटीमुळे ‘भेडिया २’बाबतही चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. मात्र, नव्या चित्रपटाची किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. एकूणच, क्रितीने एका छोट्याशा व्हिडिओतून चाहत्यांना मोठं कोडं घातलं आहे. आता ही भेट केवळ मैत्रीची आहे की पडद्यावर पुन्हा ‘भेडिया’ची डरकाळी ऐकू येणार, याचं उत्तर येणाऱ्या काळातच मिळणार आहे.

Read About: Neha Sharma AI photos and videos – एआय फोटो-व्हिडिओंवर नेहा संतापली, कायदेशीर कारवाईचा इशारा

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.