Ad Advertisement Ad Advertisement

Enervenue Nickel Hydrogen Battery : 30 वर्षे आयुष्य, 30 हजार चार्जिंग सायकल्स!

30000 Battery Cycles, 30 Year Battery Life हाँगकाँगच्या उद्योगपतीचा पाठिंबा असलेल्या स्टार्टअपने चीनमध्ये सुरू केला बॅटरी उत्पादन प्रकल्प

शांघाय : Enervenue Nickel Hydrogen Battery जागतिक पातळीवर हरित ऊर्जेची मागणी वेगाने वाढत असताना, ऊर्जा साठवणूक (एनर्जी स्टोरेज सिस्टिम – ईएसएस) तंत्रज्ञानात एक मोठी क्रांती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हाँगकाँगचे दिग्गज उद्योगपती पीटर ली का-किट यांच्या ‘फुल व्हिजन कॅपिटल’चा पाठिंबा असलेल्या ‘एनरव्हेन्यू’ या कॅलिफोर्नियास्थित स्टार्टअप कंपनीने चीनच्या चांगझू येथे आपल्या नवीन ‘निकेल-हायड्रोजन’ बॅटरीच्या उत्पादन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे आयुर्मान तब्बल ३० वर्षे आहे आणि किमान ३० हजार वेळा चार्जिंंग होऊ शकते. सदर नवीन बॅटरी सध्या बाजारात वर्चस्व गाजवत असलेल्या ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ (एलएफपी) बॅटरींना थेट आव्हान देईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनिंग राथ यांनी व्यक्त केला आहे.

निकेल-हायड्रोजन बॅटरीची थक्क करणारी वैशिष्ट्ये
  • दीर्घायुष्यी : सध्या वापरल्या जाणाऱ्या एलएफपी बॅटऱ्या साधारणपणे १० ते १५ वर्षे टिकतात आणि त्या ५ ते ६ हजार वेळा चार्ज-डिस्चार्ज आवर्तन (सायकल्स) करता येतात. मात्र, एनरव्हेन्यूची निकेल-हायड्रोजन बॅटरी ३० वर्षे टिकेल आणि ३०,००० चार्ज-डिस्चार्ज सायकल्स देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
  • अत्यंत सुरक्षित, अग्निप्रतिरोधक : या बॅटऱ्यांमध्ये ‘थर्मल रनअवे’मुळे (उष्णतेमुळे) आगीचा किंवा स्फोटाचा कोणताही धोका नाही. त्यामुळे अतिशय विषम आणि अत्यंत उष्ण किंवा थंड हवामानातही या बॅटऱ्या सुरक्षितपणे काम करू शकतात.
  • अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर : हे तंत्रज्ञान गेल्या काही दशकांपासून अंतराळ संशोधन (एरोस्पेस) क्षेत्रात वापरले जात आहे. कंपनीने या तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करून त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यात यश मिळवले आहे.
  • उत्पादन आणि भविष्यातील विस्तार सध्याची क्षमता: चांगझू येथील प्लांटची सध्याची वार्षिक उत्पादन क्षमता २५० मेगावॉट तास आहे. भविष्यातील लक्ष्य: २०२७ पर्यंत ही क्षमता १ गिगावॉट-तास आणि २०२८ पर्यंत अनेक गिगॅवेट तास पर्यंत वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
  • जागतिक विस्तार: कंपनीला आधीच अनेक महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. चीननंतर अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्येही उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
चिनी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान

सध्या जागतिक एनर्जी स्टोरेज बॅटरी बाजारावर ८० टक्क्यांहून अधिक ताबा चिनी कंपन्यांचा (उदा. सीएटीएल) आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा, ई-व्ही चार्जिंग स्टेशन आणि पॉवर ग्रिड्ससाठी या नवीन निकेल-हायड्रोजन बॅटऱ्या अत्यंत किफायतशीर आणि शाश्वत पर्याय ठरणार आहेत. ‘टाइम’ मासिकाने २०२५ मधील अमेरिकेतील टॉप-१० ग्रीन टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये एनरव्हेन्यूचा समावेश केला होता. आता ३०० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारल्यानंतर कंपनीने प्रत्यक्ष व्यावसायिक उत्पादन सुरू केल्यामुळे ऊर्जा साठवणूक क्षेत्राचे चित्र बदलू शकते.

Read About: AI and Jobs : एआय आणि नोकरी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.