Ad Advertisement Ad Advertisement

Online Porn Industry Owners : अब्जावधींच्या पॉर्न उद्योगाचे खरे मालक कोण?

पत्रकार पॅट्रिसिया नील्सन यांचा पाच वर्षांचा तपास; पॉर्नहबच्या मालकीपासून डिजिटल पेमेंट, जाहिराती आणि इंटरनेटच्या बदलत्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक महत्त्वाचे पैलू उघड.

वॉशिंग्टन : Online Porn Industry Owners एकेकाळी जगातील मोठ्या पॉर्न उद्योगाचे मालक प्रसिद्धीच्या झोतात असायचे. ‘हसलर’चे लॅरी फ्लायंट आणि ‘प्लेबॉय’चे ह्यू हेफनर यांसारखी नावे सर्वपरिचित होती. मात्र इंटरनेटच्या युगात परिस्थिती बदलली आहे. जगातील मोठ्या अडल्ट-कंटेंट कंपन्यांचे मालक आता आपली ओळख आणि वैयक्तिक आयुष्य शक्य तितके गुप्त ठेवतात. पत्रकार पॅट्रिसिया नील्सन यांनी आपल्या ‘गिल्टी प्लेजर : द पोर्निफिकेशन ऑफ द इंटरनेट, द इकॉनॉमी अँड एव्हरीथिंग एल्स’ या पुस्तकातून या अदृश्य उद्योगविश्वाचा तब्बल पाच वर्षे तपास केला आहे.

नील्सन यांच्या मते, ऑनलाइन अडल्ट उद्योगाची रचना आता तंत्रज्ञान, डिजिटल ट्रॅफिक, पेमेंट प्रोसेसिंग, डेटा आणि जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यांनी विविध पॉर्न उद्योग परिषदांना भेट दिल्यानंतर या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना प्रत्यक्ष कंटेंटपेक्षा वेब ट्रॅफिक आणि पेमेंट यंत्रणेमध्ये अधिक रस असल्याचे पाहिले. या क्षेत्रातील काही मोठे मालक स्वत: अडल्ट मनोरंजनाशी फारसे जोडलेले नसून तंत्रज्ञान किंवा वित्तीय क्षेत्रातून आले आहेत, असेही त्यांना आढळले.


‘पोर्नहब’चा ‘गुप्त’ मालक कोण?

नील्सन यांनी २०१३ ते २०२३ दरम्यान ‘माईंडगिक’चा मालक असलेल्या बर्नड बर्गमायर यांचा शोध घेतला. ऑस्ट्रियन नागरिक आणि माजी गोल्डमॅन सॅक गुंतवणूक बँकर असलेले बर्गमायर यांनी पोर्नहबसह मोठे अडल्ट-कंटेंट साम्राज्य उभे केले होते. मात्र ते इतके गुप्तपणे वावरत होते की उद्योगातील काही लोक त्यांना जवळजवळ ‘भूत’ मानत होते.

नील्सन यांच्या मते, बर्गमायर यांना या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यात अधिक रस होता; ‘सेक्स वर्क’ किंवा कंटेंट निर्मितीच्या सामाजिक पैलूंमध्ये त्यांचा विशेष रस असल्याचे दिसत नव्हते. २०२० मध्ये पोर्नहबने असत्यापित (नॉन व्हेरिफाईड) लाखो व्हिडिओ हटवले. यातील काही व्हिडिओंमध्ये विनासंमतीने तयार केलेला किंवा शोषणाशी संबंधित कंटेंट असण्याची शक्यता होती.

मालक शोधणे, उद्योगावर नियंत्रण ठेवणे कठीण

प्रागमध्ये नील्सन यांनी पेटंहाऊसशी संबंधित वेबग्रुप झेक रिपल्बिकच्या मालकाचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यात फारसे यश आले नाही. नील्सन यांच्या मते, एका वेबसाइटवर कारवाई केली तरी दुसऱ्या देशातून अनेक कॉपीकॅट वेबसाइट्स सुरू होऊ शकतात. त्यामुळे वेबसाइटमागे नेमके कोण आहे, ते कुठे आहेत आणि आर्थिक फायदा कोणाला होतो, हे शोधणे नियामकांसाठी कठीण ठरते.

इंटरनेटच्या वापराची पद्धतही बदलली?

नील्सन यांचा आणखी एक महत्त्वाचा दावा म्हणजे ऑनलाइन पॉर्न उद्योगाने इंटरनेटच्या तांत्रिक विकासावर प्रभाव टाकला. जलद आणि सुरळीत व्हिडिओ स्ट्रीमिंग, लाईव्ह कॅमिंग, प्रेक्षकांचे लक्ष दीर्घकाळ टिकवणे आणि वापरकर्त्यांच्या आवडीनुसार कंटेंट दाखवणे यासारख्या पद्धतींना या उद्योगाने सुरुवातीच्या काळात मोठी चालना दिली.

पुढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही वापरकर्त्यांना सतत स्क्रोल करत ठेवण्यासाठी, त्यांच्या आवडीनुसार कंटेंट दाखवण्यासाठी आणि अधिक वेळ ऑनलाइन राहण्यास प्रवृत्त करण्यासाठी अशाच तंत्रांचा वापर वाढला.

नील्सन ‘ऑनलाइन सेक्स वर्क’कडे केवळ नैतिकतेच्या चौकटीतून न पाहता संबंधित महिलांचे अनुभव समजून घेण्याची गरज व्यक्त करतात. काही महिलांसाठी हे आर्थिक स्वावलंबनाचे साधन ठरते, तर काही जणी मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचेही त्यांच्या तपासात दिसून आले. त्यांच्या मते, ऑनलाइन पॉर्न उद्योगाचा विस्तार हा केवळ लैंगिकतेचा विषय नाही. बदलती रोजगारव्यवस्था, आर्थिक असुरक्षितता, सोशल मीडिया, स्वत:च्या प्रतिमेचे मॉनेटायझेशन आणि इंटरनेटची व्यसनाधीन रचना यांच्याशीही त्याचा संबंध आहे. त्यामुळे पॉर्न उद्योगाचा इतिहास हा काही अंशी आधुनिक इंटरनेटच्या बदलत्या स्वरूपाचा इतिहासही ठरतो.

Read About : Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.