Ad Advertisement Ad Advertisement

Kareena Kapoor King Movie – ‘किंग’ मध्ये करीना कपूरची खास एन्ट्री

‘रा. वन’ नंतर १५ वर्षांनी पुन्हा एकत्र

मुंबई : Kareena Kapoor King Movie – शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ चित्रपटात आता अभिनेत्री करीना कपूर खान चीही खास एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. करीना या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार असून, शाहरुखसोबत एका खास डान्स नंबरमध्ये ती सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. या गाण्याचे नाव ‘डॅडी कूल’ असल्याचे सांगितले जात आहे

या गाण्याला संगीतकार जोडी सचिन-जिगर संगीत देणार असल्याची माहिती आहे. हे गाणे ‘किंग’मधील खास आकर्षण ठरावे, यासाठी निर्माते मोठ्या स्तरावर त्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.

‘रा. वन’ च्या गाण्यांची आठवण होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॅडी कूल’ हे गाणे शाहरुख आणि करीनाच्या ‘रा. वन’मधील ‘चम्मक छलो’ आणि ‘क्रिमिनल’ या लोकप्रिय गाण्यांच्या धर्तीवर भव्य पद्धतीने सादर केले जाऊ शकते. या गाण्यासाठी भारतीय कलाकारांसोबत आंतरराष्ट्रीय गायकांनाही सहभागी करून घेण्याची योजना असल्याची चर्चा आहे. मात्र, या गाण्याबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

१५ वर्षांनी शाहरुख-करीना पुन्हा एकत्र

शाहरुख खान आणि करीना कपूर यांनी यापूवी ‘कभी खुशी कभी गम’, ‘अशोका’ आणि ‘रा. वन’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. करीनाने ‘डॉन’ आणि ‘बिल्लू’मध्येही विशेष भूमिका साकारल्या होत्या. आता तब्बल १५ वर्षांनी ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘किंग’ मध्ये दिग्गज कलाकार

‘किंग’ हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत असून, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा एका अनुभवी मारेकऱ्याभोवती फिरते. तो एका तरुण शिष्याला प्रशिक्षण देतो आणि दोघेही धोकादायक परिस्थितीत अडकतात, अशी माहिती आहे.

२४ डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘किंग’

गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि सिद्धार्थ व ममता आनंद यांच्या मार्फ्लक्सि पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. सचिन-जिगर यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे आहे. ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि करीनाची पुन्हा एकदा पडद्यावर दिसणारी जोडी आणि ‘डॅडी कूल’ या कथित गाण्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Read About : Ikkis 2 and Shak Season 2 – ‘इक्का २’ आणि ‘शक २’ ची चाहत्यांना भेट

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.