Ad Advertisement Ad Advertisement

Ramayana movie 2026 : ‘रामायण’ चित्रपटाचा नवा विक्रम!

तब्बल ४० भाषांमध्ये जगभरात होणार रिलीज; दसऱ्यापासून ॲडव्हान्स बुकिंग

मुंबई : Ramayana movie 2026 : चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षीत आणि भव्यदिव्य ‘रामायण’ चित्रपटाच्या रिलीजसाठी आता महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरला असून, प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ रोजी (दिवाळीच्या आठवड्यात) जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून, २० ऑक्टोबर (दसरा) पासून ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे.
दरम्यान, निर्माते नमित मल्होत्रा आणि त्यांची टीम या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आजवरचा सर्वात मोठा भारतीय रिलीज बनवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे.

जगभरातील जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘रामायण’ चित्रपट तब्बल ४० आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. यामुळे परदेशी प्रेक्षकांना सबटायटल्सवर अवलंबून न राहता त्यांच्या स्वत:च्या भाषेत या महाकाव्याचा अनुभव घेता येईल.
चित्रपटाच्या जागतिक वितरणासाठी ‘सोनी पिक्चर्स’ची साथ मिळाली असून, सिनेमाकॉन २०२६ आणि सॅन डिएगो कॉमिक-कॉनमध्येही या चित्रपटाचे मोठे प्रमोशन करण्यात आले होते. चित्रपट कोणत्या ४० भाषांमध्ये रिलीज होणार आहे, याची पूर्ण यादी येत्या एक-दोन आठवड्यांत जाहीर केली जाईल.

या पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर (प्रभू श्रीराम), साई पल्लवी (माता सीता), यश (रावण), लक्ष्मण (रवी दुबे) आणि सन्नी देओल (भगवान हनुमान) यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘दंगल’ फेम नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, नमित मल्होत्रा यांनी याची निर्मिती केली आहे.

Read About: Nana Patekar : नाना गेले पण नाना संपले नाहीत
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.