सेंसेस इलेक्ट्रॉनिक्सचे एआय-आधारित फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञान; हजेरीसोबत विद्यार्थ्यांच्या लक्षावरही नजर
नवी दिल्ली : Senses AI Attendance System शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपनी ‘सेंसेस इलेक्ट्रॉनिक्स’ने भारतातील पहिले एआय-आधारित चेहरे ओळखणारे (फेशियल रेकगनिशन) हजेरी तंत्रज्ञान ‘सेन्सआय’ लाँच केले आहे. हे सॉफ्टवेअर थेट सेंसेसच्या ‘इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल’मध्ये जोडण्यात आले असून, यामुळे अवघ्या १ सेकंदाच्या आत विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षकांचा हजेरी घेण्यात जाणारा १० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्याचा चेहरा ओळखून अवघ्या १ सेकंदात हजेरी नोंदवली जाते. यानंतर शिक्षकांना आवाजाद्वारे कोण उपस्थित आहे याची माहिती मिळते.
विद्यार्थ्यांना डुलकी काढणे अवघड
हे सॉफ्टवेअर केवळ हजेरीच घेत नाही, तर वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष आहे की नाही, हे देखील तपासते. विद्यार्थी सलग २ मिनिटे विचलित किंवा झोपलेला आढळल्यास, स्क्रीनशॉट आणि वेळेसह त्याचा अहवाल मुख्याध्यापक व प्रशासकांना पाठवला जातो.
पूर्ण डेटा सुरक्षा
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याचा सर्व डेटा कोणत्याही बाहेरच्या सर्व्हरवर न जाता थेट शाळेच्या स्वत:च्या सर्व्हरवरच साठवला जाईल. यामुळे ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, २०२३’ चे पूर्ण पालन होते.
१ लाखांहून अधिक वर्गखोल्यांत वापर
सेंसेसचे सह-संस्थापक आणि सीईओ सजेश राधाकृष्णन यांनी सांगितले की, शिक्षकांचा वेळ वाचवून तो अध्यापनासाठी वापरणे हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे. सध्या भारतातील १०,५०० हून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये आणि १ लाखाहून अधिक वर्ग खोल्यांमध्ये सेंसेसच्या पॅनेल्सचा वापर केला जात आहे. तसेच कंपनीने आतापर्यंत ३ लाखांहून अधिक शिक्षकांना याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणित केले आहे.
Read About: AI Palm Reading Trend 2026- आता थेट एआय कडूनच भविष्य जाणून घेण्याची क्रेझ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.