तेलंगणाच्या पाद्रीने १० रूपयांच्या चिल्लरमधून खरेदी केली स्वप्नातील दुचाकी
लक्सेट्टीपेट (तेलंगणा) : Inspirational Story थेंबे थेंबे तळे साचे या जुन्या म्हणीचा अचूक प्रत्यय तेलंगणा राज्यातील मंचेरिअल जिल्ह्यातील लक्सेट्टीपेट येथे आला आहे. येथील एका ५१ वर्षीय चर्चचे पाद्री बी. रवी जोसेफ यांनी कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनीकडून कर्ज न घेता, केवळ १० रुपयांची नाणी साठवून १.२३ लाख रुपयांची दुचाकी खरेदी केली आहे. त्यांच्या या अनोख्या आणि शिस्तबद्ध बचतीची संपूर्ण जोरदार चर्चा सुरू आहे.
तीन वर्षांची शिस्तबद्ध बचत
पाद्री रवी जोसेफ यांचे स्वतःची एक दुचाकी असावी असे अनेक वर्षांचे स्वप्न होते. मात्र, एकाच वेळी मोठी रक्कम खर्च करणे किंवा व्याजाच्या चक्रात अडकणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या दैनंदिन घरगुती खर्चातून वाचणारी १० रुपयांची नाणी एका मोठ्या गल्ल्यात साठवण्यास सुरुवात केली. रोज थोडी थोडी करत ही नाणी एका गोणीत जमा झाली.
शोरूममध्ये नाण्यांचे ढीग पाहून कर्मचारी थक्क
जेव्हा पाद्री जोसेफ यांनी दुचाकी खरेदी करण्याचे पक्के केले, तेव्हा ते १० रुपयांच्या नाण्यांनी भरलेली जड पोती घेऊन थेट लक्सेट्टीपेट येथील दुचाकीच्या शोरूममध्ये पोहोचले. सुरुवातीला शोरूममधील व्यवस्थापक आणि कर्मचारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाणी पाहून पूर्णपणे थक्क झाले. त्यानंतर शोरूमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ती नाणी मोजायला सुरुवात केली. तब्बल दोन तास सलग नाणी मोजल्यानंतर ती रक्कम १.२३ लाख रुपये भरली आणि जोसेफ यांना त्यांच्या स्वप्नातील गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली.
इच्छा असेल तर मार्ग दिसतो
आपले स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना पाद्री रवी जोसेफ म्हणाले, “स्वतःची हक्काची दुचाकी असावी हे माझे स्वप्न होते, जे पूर्ण झाले आहे. कर्ज काढून किंवा हप्ते भरत बसण्यापेक्षा मी रोजच्या खर्चातून चिल्लर वाचवण्याचा पर्याय निवडला. आज माझी तीन वर्षांची मेहनत सार्थकी लागली आहे.
Read About: Aging heart rejuvenation – युवा शरीरात वृद्धाचे हृदयही होते पुन्हा तरुण!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.