Ad Advertisement Ad Advertisement

Lucknow Murder Case : उद्योजक शिव शर्मा मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा

ब्लॅकमेलिंगच्या आरोपांसह सीसीटीव्ही फुटेज आणि संशयास्पद ऑडी कारची पोलीस तपासणी

लखनौ : Lucknow Murder Case उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हजरतगंज भागातील अवध ग्रीन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून २८ वर्षीय रेस्टॉरंट आणि कापड व्यावसायिक शिव शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी शर्मा कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून लखनौ पोलिसांनी त्यांची प्रेयसी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रद्धा दुबे हिच्यासह तिची बहीण रश्मी, ड्रायव्हर डॅनिश आणि इतर दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

९ ऑक्टोबर रोजी रात्री शिव शर्मा यांचा मृतदेह अपार्टमेंटच्या खाली सापडला, तेव्हा त्यांनी केवळ अंतर्वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या चेहऱ्यावर लिपस्टिकचे डाग, शरीरावर मेकअप, तसेच जखमा आणि सिगारेटचे चटके दिल्याच्या खुणा होत्या, असा आरोप शिव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फ्लॅटमधून आक्षेपार्ह वस्तू जप्त

पोलिसांनी श्रद्धा दुबेच्या फ्लॅटची झडती घेतली असता, तिथे सेक्स टॉइज आणि संबंध ठेवण्याची क्षमता वाढवणारी औषधे तसेच नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत

ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचे आरोप

शिव शर्मा यांच्या आई रंजना शर्मा यांनी पोलिसात तक्रार केली आहे की, श्रद्धा दुबे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मुलाला ओलीस ठेवून छळत होती आणि त्याला ब्लॅकमेल करत होती. श्रद्धानेच शिव यांना बाल्कनीतून ढकलून दिले असून, तिचे अनेक बडे राजकीय नेते, वरिष्ठ नोकरशहा आणि क्रिकेटपटूंसोबत संबंध असल्याचे सांगून ती शिवला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देत होती.

सचिवालय लेबल असलेल्या ऑडीची एन्ट्री

शिव शर्मा खाली पडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अपार्टमेंटच्या आवारात एक पांढऱ्या रंगाची ऑडी कार आली, ज्यावर सचिवालय असे लिहिले होते. ती कार थोड्या वेळाने तिथून निघून गेली, ज्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

श्रद्धा दुबे बहिणीसह फरार

घटनेनंतर मुख्य आरोपी श्रद्धा दुबे तिच्या बहिणीसह फरार झाली असून पोलीस तिच्या शोधात दिल्ली आणि नेपाळच्या सीमांवर छापेमारी करत आहेत. पोलीस सध्या अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज, शिव आणि श्रद्धा यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स आणि शवविच्छेदन अहवालाची तपासणी करत आहे.

Read About : MCOCA Against Rahul Chabukswar संभाजीनगरातील कुख्यात राहुल चाबुकस्वारसह टोळीवर मकोका
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.