Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Rabi Sowing – रब्बी हंगामातही पावसाची हुलकावणी; मराठवाड्यात केवळ 20 टक्के पेरणी !

पाणी असणारे घेतील गहू-हरभरा, नाही ज्वारी कसा मिळणार चारा?

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : Marathwada Rabi Sowing पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात सापडला आहे. कृषी विभागाकडून प्राप्त पेरणी अहवालानुसार छत्रपती संभाजी नगर सह मराठवाड्यात रब्बी हंगामामध्ये केवळ २० टक्के पेरणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंचनासाठी म्हणजेच पाण्याची सोय असलेले काही शेतकरी गहू आणि हरभरा पीक घेण्याच्या तयारीत असून, चारा पिकांसाठी रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्याचे आव्हान मात्र कायम आहे.

मराठवाड्यात रब्बी हंगामातील पेरणीसाठी परतीचा पाऊस कुठेही झाला नाही. परिणामी, जमिनीत कुठे यत्किंचितही ओलावा नाही. रब्बी ज्वारी हे प्रमुख पीक असलेल्या परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात अवघ्या ४ टक्के एवढ्या क्षेत्रावरही पेरणी झालेली नाही. त्यामुळे जनावरांसाठी चारासुद्धा उपलब्ध होणार नसल्याची भीषण स्थिती आहे. संपूर्ण मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी पिकाखालील सरासरी २२ लाख ३६ हजार ७७९ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. आतापर्यंत आठ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हंगामाच्या अखेरपर्यंत केवळ २० टक्के पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.


रब्बी हंगाम संकटात

कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या रब्बी हंगामाच्या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी पिकनिहाय मांडणी केली. त्यानुसार रब्बी हंगाम संकटात असून, उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे सांगितले. पाऊस नसल्यामुळे ज्वारी, हरभरा, करडई पिकांखालील क्षेत्र कमालीचे घटले असून, आतापासूनच अन्नधान्यांचे भाव कडाडले आहेत. Marathwada Rabi Sowing


नोव्हेंबरपर्यंत पेरणी

सिंचनासाठी पुरेसे पाणी असलेले शेतकरी गहू आणि हरभरा पीक घेण्याची तयारी करीत आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेरणी करता येणार आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनात ८० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. आता रब्बी हंगामातील
उत्पादनामध्येही मोठी घट होणार आहे. केवळ गहू आणि हरभरा ही पिके कशीबशी निघण्याची शक्यता आहे.


चारा पिकाचे आव्हान

दरम्यान, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन कृषी विभागासह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासकीय पातळीवर चाराटंचाई टाळण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल एवढाच चारा आता शिल्लक आहे. या परिस्थितीत चारा पिकांना प्राधान्य दिल्यास चारा उपलब्ध होईल, असे रामेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.

Read About : Maharashtra Fodder Camps Biometric – चारा छावण्यांमध्ये बायोमेट्रिक हजेरी, सीसीटीव्ही बंधनकारक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.