Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Market in Chhatrapati Sambhajinagar – आकर्षक आकाशकंदीलसह नानाविध पणत्यांना मागणी!

दिवाळीचा बाजार गजबजला, खरेदीला सुरू, मात्र दुष्काळाचे सावट

छत्रपती संभाजीनगर : Diwali Market in Chhatrapati Sambhajinagar दिवाळीसण तोंडावर आला असून, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. विविध आकारांचे आकर्षक आकाशकंदील, नानाविध पणत्या, मातीच्या सुबक वस्तू, रंगीबेरंगी प्लास्टिक फुलांच्या माळा, रांगोळीचे साचे आणि सजावटीच्या वस्तूूूंनी दुकाने सजली आहेत. खरेदीसाठी गर्दी दिसत असली तरी यंदा बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. परराज्यातून विक्रीसाठी आलेल्या कलाकुसरीच्या वस्तू आणि पणत्यांना मोठी मागणी आहे. शहरात रविवार, १ नोव्हेंबरपासून बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीसाठी अधिक गर्दी होईल, असे विक्रेते अभय स्वभावणे यांनी ‘पुण्यनगरी’ ला सांगितले.


दिवाळीचा सण तीन-चार दिवसांवर आला असून, शहरात दिवाळीसाठी खरेदीला सुरुवात झाली आहे. दुष्काळामुळे आयुष्यात काळोख पसरला असला श्रीलक्ष्मीपूजनाचा हा सण कसाबसा साजरा करावा लागणार आहे. दिवाळी प्रकाशमान करणाऱ्या पणत्या, आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू, रांगोळीची विक्री सुरू झाली आहे. शहरातील जुन्या भागातून पणत्यांसह गवळण, बोळक्यांची निर्मिती आणि विक्री करण्यात येत आहे. गुजरात, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांतून पणत्या, साखळीचे दिवे, तरंगते दिवे शहरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यंदा १ कोटीपेक्षा अधिक पणत्यांची विक्री होईल, असा अंदाज बेगमपुऱ्यातील कुभारांनी व्यक्त केला. लाल मातीच्या स्थानिक पणत्यांना अधिक मागणी आहे. बेगमपुरासह मिटमिटा, पडेगाव भागातील कारागिरांच्या पणत्या आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून दिवाळीसाठी अत्यावश्यक साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. पणत्यांच्या किमतीमध्येही काही प्रमाणात वाढ झाली असून, ४० ते ५० रुपये प्रतिडझन दराने पणत्यांची विक्री होत असल्याचे नानासाहेब जोरवे यांनी सांगितले. शहरात ठोक विक्रेत्यांकडूनही पणत्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. डिझाइन आणि साध्या पणत्यांच्या किमती वेगळ्या आहेत, असे जोरवे म्हणाले.

आकाशकंदीलचे दर वाढले

आकर्षक आकाशकंदीलांची मोठी विक्री होत आहे. शहराताल ४० ठोक विक्रत्यांकडून पणत्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात डिझाइन आणि साध्या पणत्यांचा समावेश आहे. आकर्षक आकाशकंदीलांची मोठी विक्री झाली आहे. मुंबई इथून आकाशकंदील विक्रीसाठी आणले आहेत, अशी माहिती विक्रेते अशोक जाधव यांनी दिली आहे. आतापर्यंत जवळपास ४ लाख आकाशकंदील शहरात विक्रीसाठी आल्याचा अंदाज आहे. आकाशकंदीलाच्या दरात वाढ झाली आहे. बांबू आणि कागदाचा वापर करून पारंपरिक पद्धतीच्या आकाशकंदीलांनाही मोठी मागणी आहे.

नक्षीदार कंदिलांना मागणी

धातू, ज्यूट, कापड आणि लाकडी आकाश कंदीलांचे विविध प्रकार विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तरंगत्या आकाशकंदीलांना मोठी मागणी आहे. हंडी, चांदणी, ढोल आकाराचे आणि पाण्यात न भिजणारे, पाण्याने धुता येणारे आकाशकंदीलही आहेत. देवता,
स्वस्तिक, ओम प्रतिमा असलेल्या आकाशकंदीलांची मागणी कायम आहे. यंदा वेगवेगळ्या फुलांच्या आकारातील कंदीलांची अधिक विक्री होत आहे. साधारणत: ३०० रुपये ते १२०० रुपये दरम्यान आकाशकंदीलाच्या किमती आहेत. नक्षीकाम आणि झिरमळ्या असलेल्या बहुकोनी आकाशकंदीलांची अधिक विक्री झाल्याचे सोभावणे बंधूंनी सांगितले.

बंगालमधील सजावटीचे साहित्य

दरम्यान, दिवाळीत सजावटीसाठी मातीच्या आकर्षक वस्तू आल्या आहेत. मातीचे मुखवटे, झुंबर, रंगीत मोठी पणती, मूर्त्या, लहानसे तुळशी वृंदावन, जाते, तोरण, कठपुतळी, समई या वस्तूंनाही चांगली मागणी आहे, असे गुलमंडी येथील विक्रेत्या रंजना काथार यांनी सांगितले. या वस्तू ३० ते १५० रुपयांच्या दरम्यान विक्री होत आहेत. यंदा पश्चिम बंगालमधून सजावटीच्या सर्वाधिक वस्तू बाजारात आल्या असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read About : ST Employees Diwali Bonus – दिवाळी तोंडावर, एसटीच्या 88 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन-बोनस रखडले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.