Ad Advertisement Ad Advertisement

EV Testing Facilities in Chhatrapati Sambhajinagar – ईव्ही उद्योगाच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगरात सामायिक चाचणी सुविधांची गरज

५० हजार कोटींच्या प्रस्तावित ईव्ही गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचणी, संशोधन आणि कुशल मनुष्यबळ विकासावर भर; हफक इंडियाचा पुढाकार

छत्रपती संभाजीनगर : EV Testing Facilities in Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगरमधील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगाच्या विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक चाचणी सुविधा, सिम्युलेशन आधारित तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्याची गरज उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. हफक इंडियाच्या वतीने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आयोजित ‘ड्राइव्ह सीएसएन’ कार्यशाळेत उद्योग प्रतिनिधी, वाहन उत्पादक, संशोधन संस्था आणि तांत्रिक तज्ज्ञांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

छत्रपती संभाजीनगर परिसरात ईव्ही क्षेत्रात ५० हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू समूहाच्या प्रस्तावित २७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासह टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या प्रस्तावित प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय एथर एनर्जी आणि युनो मिंडा यांसारख्या कंपन्यांची उपस्थिती औद्योगिक क्षेत्राला बळ देत आहे. परिसरात १,६४८ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) असून, ३० हजारांहून अधिक कामगार उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे ईव्ही उद्योगासाठी स्थानिक पातळीवर पुरवठा साखळी विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.


मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिल (मॅजिक), मराठवाडा ऑटो क्लस्टर (एमएसी) आणि देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा. लि. (डीईसीपीएल) यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. ‘छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रादेशिक औद्योगिक मूल्यसाखळी विकसित करणे’ हा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. या कार्यशाळेत पियाजिओ, सेंटर ऑफ एक्सलन्स इन ॲडव्हान्स्ड ऑटोमोटिव्ह रिसर्च (सीएएआर), ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), मॅथवर्क्स, पीएमॅनिफोल्ड, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ईव्ही सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्यासह विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

एमएसएमईंसाठी सामायिक चाचणी सुविधा उभारण्याची गरज


‘एमएसएमई आणि स्टार्टअप्समध्ये उत्पादन विकासाची क्षमता वाढत असल्याने तसेच केंद्र सरकारकडून स्थानिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात असल्याने विकास आणि प्रमाणीकरण चाचण्यांची गरज अधिक वेगाने वाढत आहे,’ असे मत पुणे येथील एआरएआयचे उपसंचालक अभिजित मुळे यांनी व्यक्त केले.प्रादेशिक उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी चार प्रमुख उपाय सुचविण्यात आले. यामध्ये शासन आणि उद्योगांच्या संयुक्त सहभागातून सामायिक चाचणी सुविधा उभारणे, सध्याच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, सिम्युलेशन आधारित आणि प्रत्यक्ष चाचण्यांची सांगड घालणे तसेच एमएसएमई आणि स्टार्टअप्सना तांत्रिक मार्गदर्शन व ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण करणे, यांचा समावेश आहे.’कंपन्यांनी जमीन आणि उपकरणांवर अधिक पैसा खर्च करण्याऐवजी संशोधन, नवनवीन उत्पादनांची निर्मिती आणि उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यावर गुंतवणूक करावी. त्यासाठी सर्व कंपन्यांना वापरता येतील अशा सामायिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे,’ असे मत सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड ऑटोमोटिव्ह रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिरू श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.

Read About : OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.