Ad Advertisement Ad Advertisement

Yuva Mahotsav – युवा महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य, पथनाट्य सादरीकरणाने रंगत !

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ होते थीम

छत्रपती संभाजीनगर : Yuva Mahotsav क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने माय भारत, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट आणि गाईड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव लोकगीत, लोकनृत्य आणि पथनाट्य सादरीकरणाने रंगतदार झाला. शुक्रवार, ३० ऑक्टोबर २६ रोजी विभागीय क्रीडा संकुलमधील सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. समूह लोकनृत्य, समूह लोकगीतसह चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विविध शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील कलावंतांचे संघ सहभागी झाले होते.


महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नटराजाला पुष्पहार अर्पून, दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हा युवा अधिकारी मयुर कुमार, भारत स्काऊट अँड गाईडच्या जिल्हा संघटक वनिता बोरा, माजी क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे यांनी केले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन करून आभारप्रदर्शन केले.


महोत्सवातील विजेत संघ

समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम शिवछत्रपती महाविद्यालय, द्वितीय माऊंट व्हॅली टेक्नो स्कूल आणि तृतीय आणि माऊंट व्हॅली टेक्नो स्कूलने तृतीय क्रमांक पटकाविला. समूह लोकगीत स्पर्धेत प्रथम पाथ्री येथील राजश्री शाहू कॉलेज, द्वितीय ‘बामु’ विद्यार्थी विकास मंडळ आणि इं. भा. पाठक महाविद्यालय व देवगिरी महाविद्यालयाने यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. चित्रकला स्पर्धेत प्रथम मधुरा कांजणे, द्वितीय गौरी चंदनशिवे आणि संचिता सावंत हिने तृतीय क्रमांक पटकाविला. पथनाट्य स्पर्धेत प्रथम ‘बामु’ विद्यार्थी विकास मंडळ, द्वितीय शिवछत्रपती महाविद्यालय आणि तृतीय क्रमांक माऊंट व्हॅली टेक्नो स्कूलने पटकाविला. कविता लेखन स्पर्धेत प्रथम राधिका अभय दैठणकर, द्वितीय गजानन पांडुरंग चौथमल आणि तृतीय क्रमांक सांची सिद्धोधन आराख याने पटकाविले.
विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात आली.

Read About: Shraddha Kapoor Eetha Trailer – ‘नाचता नाचता मरेन, पण इतिहास घडवून जाईन’

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.