मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची भीती, पाण्याचे व्यवस्थापन कोलमडले, वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगर :Wildlife Water Scarcity in Marathwada जंगलातील पाणवठे आटल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ जंगलाबाहेर पडून मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिसेंबरअखे पाणवठे आटण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच वन विभागाचे वन्यजीवांसाठी असलेले पाण्याचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून वन्यजीव रक्षकांच्या सूचनांवर वनविभाग गांभीर्याने विचार करीत नसल्याच्या तक्रारी आहेत.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा परिस्थितीत जंगलातील वन्यजीवांच्या पाण्याचीही समस्याही अधिकच गंभीर झाली आहे. परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ आणि ‘ऑक्टोबर हीट’ मुळे नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण वाढला आहे. वन विभागाकडून अद्याप याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
बारमाही जलस्त्रोत आटले
अनेक ठिकाणी बारमाही जलस्रोत आणि कृत्रिम पाणवठे उपलब्ध असले तरी पावसाअभावी सर्व पाणवठे कोरडेठाक पडण्याची दाट शक्यता आहे. येत्या उन्हाळ्यातील स्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक आणि जंगलातील पाणवठे आटल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडून मानव-वन्यजीव संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कृत्रिम पाणीस्त्रोतांचे जाळे वन्यजीवांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, उन्हाळ्यात काही जलस्रोत आटत असल्याने त्यांचे नियोजन आणि देखभाल हा व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग मानला जातो. जंगलातील पाणवठे आटल्यास वन्यप्राण्यांना जिल्ह्यांमध्ये पर्यायी जलस्त्रोतांचा शोध घेतला जातो. कन्नड तालुका, फर्दापूर, अजिंठासह गौताळा परिसरातील पाणवठे कोरडेठाक पडण्याची स्थिती असल्याने पाण्याच्या टंचाईचा परिणाम अधिक संवेदनशील ठरू शकतो.
५ हजार मे. टन चारा
वनविभागाच्या सुमारे ५ हजार २०० मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्याचा परिणाम जंगलातील तृणभक्षी प्राण्यांवर होऊ शकतो. अशावेळी चारा आणि पाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ आणि बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पशुधनासाठी चारा उपलब्ध करताना वन्यजीवांच्या अधिवास संतुलनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बहुतांश ठिकाणचे नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. काही ठिकाणी सौरपंपाच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी परिसरातील जलस्रोतातील पाणी सिंचनासाठी जात असले तरीही वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले नसल्याचे वन्यजीव रक्षकांनी सांगितले.
‘पाणी अडवा…’ची गरज
गौताळा अभयारण्य परिसरातील भूप्रदेशात पाणी थांबत नाही, तर ते बाहेर पडते. अशावेळी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या पद्धतीने याठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन केले, तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. मानद वन्यजीव रक्षकांनी सांगितले. वनविभागाने चारा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असली तरी त्याचा परिणाम जंगलातील तृणभक्षी प्राण्यांवर होण्याची शक्यता वन्यजीव रक्षकांनी सांगितले.
तृणभक्षी प्राण्यांना धोका
अशा प्रसंगी चारा आणि पाण्याच्या शोधात बाहेर पडलेल्या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ आणि बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तृणभक्षी प्राण्यांना धोका निर्माण त्यामुळे पशुधनासाठी चारा उपलब्ध करताना वन्यजीवांच्या अधिवास संतुलनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याप्रश्नी वन्यजीव रक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Read About : Naigaon hydropower project – सोयगावातील नायगाव जलविद्युत प्रकल्प तत्काळ रद्द करा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.