Ad Advertisement Ad Advertisement

Gunthewari Regularization Certificate – गुंठेवारीची मुदत संपली; आता प्रमाणपत्र देण्यावर भर

१६ हजार नागरिकांना दिलासा : मनपाला १२५ कोटीचे उत्पन्न

छत्रपती संभाजीनगर : Gunthewari Regularization Certificate गुंठेवारी कायद्यांतर्गत शहरातील अनधिकृत भूखंड, बांधीव घरे नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत महापालिकेकडे शहरातील तब्बल १६ हजार फाईल्स दाखल झाल्या आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे गुंठेवारीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संथ होती, आता प्रमाणपत्र वितरीत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागातून जास्त प्रतिसाद त्या भागात जास्त निधी विकासकामांवर खर्च करण्यासाठी झोननिहाय गुंठेवारीची वर्गवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे., अशी माहिती महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी (दि.२) पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी उप महापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, मनपा आयुक्त अमोल येडगे आदींची उपस्थिती होती. महापौर राजूरकर यांनी सांगितले की, महापालिकेने मागील २०-२२ वर्षांपासून गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी केली. गुंठेवारीला सातत्याने मुदतवाढ देत अंमलबजावणी करणारी राज्यातील आपली एकमेव महापालिका आहे. कुठेतरी ही प्रक्रिया थांबावी, यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती. नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुंठेवारीच्या शुल्कात सवलतही दिली. या सवलतीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला आहे.

मनपाला १२५ कोटींचे उत्पन्न

१५ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही सवलत योजना राबवली. सुमारे ३ महिन्यात १६ हजार फाइल्स गुंठेवारी कक्षात दाखल झाल्या. गुंठेवारी शुल्कापोटी महापालिकेला १२५ कोटी रुपये महसूल मिळाला. गुंठेवारीला मुदतवाढ देण्याची मागणी लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून होत आहे. मात्र फाईल्स दाखल केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र वितरीत झालेले नाही. या महिन्यात प्रमाणपत्र वितरणावर भर देण्यात येईल.

टॅक्समध्ये मिळेल सवलत

गुंठेवारीअंतर्गत बांधीव घर, भूखंड नियमित करून घेतल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना करामध्ये दिलासा मिळणार आहे. गुंठेवारी नसल्यास संबंधित मालमत्तेला डबल टॅक्स आकारल्या जातो. मनपाचे कर्मचारी टॅक्स आकारणी करण्यासाठी गेल्यास गुंठेवारी प्रमाणपत्र सादर करण्याची मागणी करतात, ते न दिल्यास डबल टॅक्स लावल्या जातो. गुंठेवारीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर नागरिकांना हा भूर्दंड पडणार नाही, असे महापौर राजूरकर यांनी सांगितले. तसेच गुंठेवारीला मुदतवाढ देण्याचा कोणताही विचार नसल्याचे महापौर राजूरकर, आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले.

Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.