पत्रकार; वकील यांची संयुक्तिक भूमिका महत्त्वाची -वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष चव्हाण यांचे प्रतिपादन | ‘पुण्यनगरी’च्या लॉयर डायरीचे आठव्या वर्षी प्रकाशन; बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ विधिज्ञांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : Puny Nagari Lawyer Diary न्यायालयीन कामकाज करताना विधज्ञिांना आवश्यक असणारी कायदेविषयक माहिती, महत्त्वाचे संदर्भ आणि उपयुक्त तपशील एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा या उद्देशाने ‘पुण्यनगरी’च्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘लॉयर डायरी’चा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि.२) उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष असून, दरवर्षी अधिकाधिक उपयुक्त आणि माहितीपूर्ण स्वरूपात डायरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे ‘पुण्यनगरी’च्या वतीने सांगण्यात आले.
न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत कार्यरत असलेल्या प्रत्येक विधज्ञिांच्या हातात ही डायरी असावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली माहिती, कायदेविषयक संदर्भ आणि महत्त्वाचे तपशील यांचा समावेश या डायरीत करण्यात आला आहे. केवळ न्यायालयीन परिसरापुरताच हा उपक्रम मर्यादित न राहता वकिलांच्या कार्यालयांमध्येही ‘पुण्यनगरी’चे कॅलेंडर आणि डायरी पोहोचते, असे कौतुकोद्गार यावेळी विविध वकिलांनी काढले.
‘पुण्यनगरी’चे कार्यकारी संपादक जाहेद शाह, जल्हिा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष चव्हाण, सचिव ॲड. सुरेश काळे, महिला उपाध्यक्षा ॲड. पल्लवी बरडे, हायकोर्ट सिनिअर कौन्सिलच्या सदस्य रूपाली चिंचपूरकर, कौटुंबिक न्यायालय वरष्ठि संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार गुंगे पाटील यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व उपस्थित मान्यवरांचे शहर जाहिरात व्यवस्थापक सुधीर बोरगावकर, ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक प्रकाश मनगटे, ब्यूरो चिफ धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
उपयुक्त सेवाभावी उपक्रम
यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधज्ञि, महिला पदाधिकारी आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘पुण्यनगरी’चा हा उपक्रम केवळ व्यावसायिक स्वरूपाचा नसून विधज्ञिांसाठी उपयुक्त ठरणारा सेवाभावी उपक्रम आहे. कायदा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधण्याचा ‘पुण्यनगरी’चा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. न्यायालयीन क्षेत्रातील पदाधिकारी आणि विधज्ञिांकडून मिळणारे सहकार्य व प्रोत्साहन यामुळे हा उपक्रम सातत्याने पुढे जात असल्याची भावना यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त के ली. सूत्रसंचालन व आभार डॉ. शेषराव पठाडे यांनी मानले.
लॉयर्स डायरी मार्गदर्शक
पत्रकार, वकील यांची संयुक्तिक भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष चव्हाण यांनी केले. कायदेशीर अडचणी येतात तेव्हा ‘पुण्यनगरी’ लॉयर्स डायरी कायम मार्गदर्शक ठरते. त्यानुसार केलेले नियोजन आणि कार्यप्रणालीसाठी ही लॉयर्स डायरी फायदेशीर ठरत असते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या मान्यवर वकिलांची उपस्थिती
ॲड. चांगुणा राजपूत, ॲड. पूनम वावरे, ॲड. पृथ्वीराज राठोड, ॲड. नीलेश दंदे, ॲड. एम. एन. मुंढे, ॲड. उद्धव पोळ, ॲड. साहेल चव्हाण, ॲड. ए. के. शेख, ॲड. सचिन पाटील, ॲड. संर्जेराव साळवे, ॲड. एस. एस. कुंदवार, ॲड. रवीराज वाघमारे, ॲड. पृथ्वीराज राठोड, ॲड. निकेतन कोठारी, ॲड. साहिल चव्हाण, राहुल जाधव यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधज्ञि, महिला पदाधिकारी आणि वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read About : justice-ravindra-ghuge-felicitation-aurangabad-high-court – औरंगाबादसह येथील हायकोर्ट माझी कर्मभूमी ; हार्डवर्क इथेच शिकलो त्याशिवाय पर्याय नाहीच
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.