टेकडीवरून परिसरातील महामार्ग, गावांवर पूर्णपणे ठेवता येते लक्ष
Ali Taher Hill तेल अविव : अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय मध्यस्थांच्या पुढाकाराने इस्त्रायल आणि हिज्बुल्लाह यांच्यात युद्धबंदी करार झाल्यानंतर लेबनानमधील बहुतांश भागात शांतता प्रस्थापित झाली होती. मात्र, दक्षिण लेबनानमधील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अली ताहेर या टेकडीवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा एकदा तीव्र संघर्ष पेटला आहे.
अली ताहेर टेकडीचे भौगोलिक महत्त्व
ही टेकडी दक्षिण लेबनानमधील मुख्य शहर नबातीये च्या जवळ असून लितानी नदीच्या उत्तर भागात स्थित आहे. अली ताहेर टेकडीवरून आसपासच्या महामार्गांवर आणि गावांवर पूर्णपणे लक्ष ठेवता येते. हिज्बुहल्लाहसाठी इक्लिम अल-तुफाह या त्यांच्या मुख्य लॉजिस्टिकल बेसला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. इस्त्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, हिज्बुहल्लाहने इराणी निधीच्या मदतीने या टेकडीखाली एक मोठे अंडरग्राउंड नेटवर्क (भुयारी मार्ग, शस्त्रास्त्रांची कोठारे, कमांड सेंटर्स आणि निवासस्थाने) तयार केले आहे.
अमेरिकेचा प्रस्ताव आणि हिज्बुहल्लाहचा नकार
अमेरिकेने मध्यस्थी करताना ही टेकडी लेबनानी लष्कराच्या स्वाधीन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जेणेकरून या भागाचे नि:शस्त्रीकरण करता येईल. परंतु, हिज्बुहल्लाहने याला स्पष्ट नकार दिला. हिज्बुहल्लाहला भीती आहे की लेबनानी लष्कराकडून इस्त्रायल ही टेकडी सहज हस्तगत करेल. ऑगस्ट २०२६ मध्ये इराणने अमेरिकेला ओमानमार्गे संदेश पाठवून इशारा दिला होता की, अली ताहेरवर इस्त्रायलने मोठा हल्ला केल्यास इराण या संघर्षात थेट हस्तक्षेप करेल आणि उत्तर देईल. इस्त्रायली लष्कराने दावा केला की त्यांनी अली ताहेर टेकडी आणि त्याखालील हिज्बुहल्लाहच्या भुयारी मार्गांवर ऑपरेशनल कंट्रोल मिळवला असून तेथील नेटवर्क नष्ट केले आहे.
टेकडीवरून हिज्बुहल्लाहचा प्रभाव पूर्णपणे संपवणे आणि उत्तर इस्त्रायलवरील ड्रोन,रॉकेट हल्ल्यांचा धोका टाळणे. ही टेकडी गमावली तरी संघर्षाचा अंत होणार नाही आणि गनिमी काव्याने लढा सुरूच राहील, असे हिज्बुहल्लाह नेत्यांचे म्हणणे आहे. लेबनानचे उपपंतप्रधान तारिक मित्री यांच्या मते, लेबनानी सैन्य तेथे तैनात होण्यास तयार आहे, परंतु इस्त्रायल स्वत:च्या राजकीय आणि २७ ऑक्टोबरच्या निवडणुकांच्या फायद्यासाठी यात अडथळे आणत आहे.
