Ad Advertisement Ad Advertisement

Tata Communications AI Super Highway : सज्ज व्हा भारताच्या ‘एआय सुपर हायवे’साठी! टाटांची 3750 कोटींची गुंतवणूक

मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईसह प्रमुख एआय कॉरिडॉरना जोडणार; दुसऱ्या टप्प्यात विझाग, भुवनेश्वर, जामनगर आणि गिफ्ट सिटीचा समावेश

नवी दिल्ली : Tata Communications AI Super Highway भारतातील डिजिटल क्रांतीला नवा वेग देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कम्युनिकेशन्सने एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. देशात हाय-स्पीड आणि अत्यंत कमी विलंब (लो-लेटन्सी) असणारे नेटवर्क उभारण्यासाठी कंपनीने सुमारे ४५० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (अंदाजे ३,७५० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात ‘एआय सुपर हायवे’ उभारला जाणार आहे.

टाटा कम्युनिकेशन्स या प्रकल्पांतर्गत देशभरात सुमारे १०,००० किलोमीटरची नवीन लांब पल्ल्याची फायबर केबल टाकणार आहे. यामुळे भारतातील सर्वात मोठ्या एआयवर आधारित दळणवळण जाळ्यापैकी एक तयार होईल. टाटा कम्युनिकेशन्सचे मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी रुपेश चोक्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ‘एआय सुपर हायवे’ भारतातील प्रमुख एआय डाटा सेंटर कॉरिडॉर्सना एकमेकांशी जोडेल, ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाउड आधारित कामांसाठी अतिशय जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल.
हे भारतीय नेटवर्क टाटा कम्युनिकेशन्सच्या जागतिक नेटवर्कशी जोडले जाईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. Tata Communications AI Super Highway

पहिल्या टप्प्यात या शहरांना फायदा…

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा भारतातील सर्वात महत्त्वाच्या मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई या एआय आणि हायपरस्केल ग्रोथ कॉरिडॉरवर केंद्रित असेल. Tata Communications AI Super Highway

दुसऱ्या टप्प्यात या शहरांना फायदा…

दुसऱ्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील नव्या डाटा सेंटर सेंटर्सचा समावेश केला जाईल. यामध्ये विझाग (वायझॅग), भुवनेश्वर, जामनगर आणि गिफ्ट सिटी (गुजरात) यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांना जोडले जाईल.

या गुंतवणुकीचा फायदा काय?
  • सध्या भारतात क्लाउडचा वाढता वापर, एआय तंत्रज्ञानाचा प्रसार आणि स्थानिक पातळीवर डाटा साठवण्याच्या वाढत्या गरजेमुळे डाटा सेंटर्सची मागणी वेगाने वाढत आहे. या नेटवर्कमुळे मोठ्या एआय प्रकल्पांना लागणारा प्रचंड डाटा गती सहज उपलब्ध होईल.
  • डाटा सेंटर कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक क्षमता केंद्रे (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स- जीसीसी) आणि डिजिटल स्थानिक उद्योगांना भारतात आपले जाळे विस्तारणे सोपे होईल.
  • आंतरराष्ट्रीय केबल भूस्तरीय केंद्रांशी थेट जोडणी मिळाल्यामुळे भारत जागतिक स्तरावर एआय आणि क्लाउड कनेक्टिव्हिटीचे मुख्य केंद्र म्हणून उदयास येईल. Tata Communications AI Super Highway

Read About : Chhatrapati Sambhajinagar Listed Companies – शेअर बाजारातही छत्रपती संभाजीनगरच्या ३० हून अधिक कंपन्या सूचीबद्ध
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.