बीड जिल्ह्यातील घटना : सुरक्षा रक्षकासह तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
Beed Windmill Company Extortion Case केज : ‘तीस लाख रुपये खंडणी द्या, अन्यथा तुमचे जेसीबी जाळून टाकू’ अशी धमकी देऊन आवादा पवनचक्की अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कंपनीच्या सुरक्षा रक्षकासह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे सर्व्हे नं. ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५०० येथील प्रभु नारायण सारूक व त्यांची पत्नी यांच्या शेतात आवादा एनर्जी प्रा. (लि.) कंपनीचे पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास आवादा एनर्जीच्या पवनचक्की प्रकल्पावर काम करीत असलेले वरिष्ठ अधिकारी विशाल जयप्रकाश शेलार, दत्ता टिंगरे, अक्षय टेकाळे, नितीन कांबळे, पवनचक्कीचे काम करणारे मजूर हे पोलिस संरक्षणात जेसीबी घेऊन काम करण्यासाठी गेले असता तेथे प्रभाकर नारायण सारूक व त्यांची पत्नी या दोघांनी काम बंद करून काम अडविले.
त्यांना हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,त्यांच्या जमिनीचा मावेजा दिला असून काम अडवू नका. त्यावर त्यांनी पैसे मिळाले नाहीत. त्यांनी ३० लाख रु. आणि त्यांच्या मुलाला नोकरी देण्याची मागणी केली. तसेच जर त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर कामावर असलेली जेसीबी जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांसमक्ष कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याचा धमकी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्याची तक्रार
या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी विशाल जयप्रकाश शेलार यांच्या तक्रारीवरून प्रभाकर नारायण सारूक, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा मच्छद्रिं प्रभाकर सारूक याच्या विरूद्ध खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. उमेश आघाव हे तपास करीत आहेत.
सुरक्षा रक्षकाविरुध्दही गुन्हा
तीन आरोपीपैकी मच्छद्रिं सारूक हा आवादा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे; मात्र त्याने त्याचे आई-वडिलांना फोन करून काम बंद करा, अशी फूस दिली. म्हणून त्याच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.