Ad Advertisement Ad Advertisement

West Bengal Husband Kills Wife : मी सायको झालोय.. पत्नीची हत्या करून कापलेले शीर घेऊन मंदिरात बसला पती

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

दक्षिण दिनाजपूर – West Bengal Husband Kills Wife पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तिचे कापलेले शीर घेऊन शेजारच्या मंदिरात जाऊन बसला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूर येथे घडली.

नेमकी घटना काय?

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय रिंटू घोष हा शेजारच्या एका मंदिरात शांतपणे बसला होता. एका शेजाऱ्याने त्याच्याजवळ जाऊन काय झाले असे विचारले असता, रिंटूच्या हातात त्याची पत्नी सीमा सरकार (४२) चे कापलेले शीर असल्याचे पाहून तो हादरला. शेजाऱ्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक घराबाहेर आले. त्यानंतर आरोपी एका हातात पत्नीचे शीर आणि दुसऱ्या हातात धारदार कोयता (कटारी) घेऊन मंदिराबाहेर आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेचे शीर जप्त केले असून, त्यांच्या घरातून धडाशिवाय असलेले मृतदेहही जप्त करण्यात आले आहे.

‘मी सायको झालोय…’

पोलीस जेव्हा आरोपीला अटक करून घेऊन जात होते, तेव्हा तो मोठ्याने ओरडून सांगत होता की, “मी सायको (मानसिक रुग्ण) झालो आहे”. दक्षिण दिनाजपूरचे पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुलांसमोरच घडले हत्याकांड

पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपीने कौटुंबिक वादातून घरातच पत्नीची हत्या केली. या दाम्पत्याला ५ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी दोन्ही मुले घरातच उपस्थित होती. आरोपीने नशा केल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, तसेच हत्येसाठी शेतीत वापरल्या जाणाऱ्या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला आहे.

तांत्रिकसारखे वागू लागला होता आरोपी

आरोपी रिंटू घोष हा पूर्वी सरकारी बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता, परंतु सध्या तो बेरोजगार होता. त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रिंटूचे वागणे खूप विचित्र झाले होते. त्याने पूर्णपणे शाकाहारी भोजन सुरू केले होते आणि त्याचे वागणे एखाद्या तांत्रिकासारखे झाले होते. पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते, मात्र याचे पर्यावसान एवढ्या मोठ्या हत्याकांडात होईल, अशी कल्पना कोणाही केली नव्हती.

Read About : Tuljapur college student death तुळजापूर येथे बेदम मारहाणीत कॉलेज तरुणाचा मृत्यू; 1 गंभीर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.