Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Gifts Educational Material Needy Students – माणुसकीच्या दिव्यांनी उजळली चिमुकल्यांची दिवाळी

फराळासह शैक्षणिक साहित्याची अनमोल भेट

छत्रपती संभाजीनगर: Diwali Gifts Educational Material Needy Students – दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि आनंदाचा उत्सव… मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांतील मुलांना या सणाचा आनंद मनमोकळेपणाने घेता येत नाही. कुणाच्या घरात परिस्थितीची चिंता, तर कुणाच्या मनात शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची गरज… अशा परिस्थितीत गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्याचा संवेदनशील प्रयत्न करण्यात आला. दिवाळी फराळासह शैक्षणिक साहित्याची भेट देत या विद्यार्थ्यांची दिवाळी अधिक गोड करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रोड परिसरातील आयप्पा तांडा येथे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनपेक्षितपणे मिळालेल्या या भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्यच या उपक्रमाचे खरे फलित ठरले. दुष्काळ, नापिकी, वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मुलांच्या शिक्षणासाठी आणि सणासुदीच्या खर्चासाठी पैसे उभे करणेही अनेक पालकांसाठी आव्हान ठरत आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा आणि त्यांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुशील बोर्डे, आशिष पवार, योगेश घुगे, प्रभाकर भोसले, आशिष इंगळे, विठ्ठल दराडे, राजू चव्हाण, पंकज पिसे उपस्थित होते.

केवळ फराळाचे वाटप नव्हे, तर भविष्याला बळ देण्याचा प्रयत्न!

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ दिवाळीचा फराळ देऊन थांबण्यात आले नाही, तर त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचीही भेट देण्यात आली. दिवाळीच्या गोड पदार्थांसोबत मिळालेल्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदात भर पडली. एका बाजूला सणाचा गोडवा आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या स्वप्नांना मिळालेली नवी उमेद, असा या उपक्रमाचा भावनिक संगम पाहायला मिळाला.

Read About : Diwali Electrical Firecracker Safety – रोषणाईचा उत्साह, पण सुरक्षेचा विसर नको!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.