Ad Advertisement Ad Advertisement

Mahavitaran Candidate Cancellation – निर्दोष मुक्तता झाल्यानंतर उमेदवारी रद्द करणे चुकीचे; महावितरणचा निर्णय रद्द

१९ मे २०२३ रोजीच्या शिफारसपत्रानुसार नियुक्तीचा विचार करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर : Mahavitaran Candidate Cancellation कौटुंबिक वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झालेल्या तरुणाची विद्युत सहायक पदासाठीची उमेदवारी केवळ गुन्हा दाखल असल्याच्या कारणावरून रद्द करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने महावितरणचा निर्णय रद्द केला. तसेच, १९ मे २०२३ रोजीच्या शिफारसपत्रानुसार नियुक्तीचा विचार करण्याचे निर्देश दिले.

जळगाव येथील शेख शोएब अहमद याची २०१९ च्या भरती प्रक्रियेत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून विद्युत सहायक पदासाठी निवड झाली होती. मात्र, चारिर्त्य पडताळणीदरम्यान त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे समोर आल्याने महावितरणने १६ जून २०२३ रोजी त्याची उमेदवारी रद्द केली. या गुन्ह्यात २७ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.

त्यानंतर शोएबने ॲड. सय्यद तौसीफ यासीन यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीअंती न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने महावितरणचा उमेदवारी रद्द करण्याचा आदेश रद्द केला. उमेदवाराने गुन्ह्याची माहिती लपवली नसून त्याची निर्दोष मुक्तताही झाली असल्याने नियुक्तीचा शिफारसपत्रानुसार विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Read About : Experimental Diabetes Implant – रक्तातील अतिरिक्त साखर शोषून घेणाऱ्या प्रायोगिक इम्प्लांटचा शोध ; टाइप – 2 मधुमेहाच्या उपचारांसाठी नवी आशा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.