Ad Advertisement Ad Advertisement

Birasane Couple Self Immolation Attempt – बिरसने दाम्पंत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी वेळीच रोखले, अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली कैफीयत

छत्रपती संभाजीनगर : Birasane Couple Self Immolation Attempt – घर, दुचाकी जाळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, झालेले नुकसान आरोपींकडून तात्काळ वसूल करावे या मागणीसाठी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील बिरसने कुटुंबियांनी मागील ७८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले आहे. या उपोषणाची कोणीही दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या बिरसने दाम्पंत्याने अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घडली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्यांना आत्महदन करण्यापासून रोखले. बिरसने कुटुंबियांची समजूत काढीत त्यांची अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्याशी भेट घालून दिली. त्या ठिकाणी त्यांनी आपली कैफीयत मांडली.

राजू कचरू बिरसने, शोभा राजू बिरसने या दांम्पत्याने आपल्या दोन मुली आणि दोन मुलांसह मागील ७८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील गायरान जमिनीवर असलेले आपले घर, मोटारसायकल, एलसीडी टीव्ही असे जवळपास ३५ लाख रुपयांचे साहित्य जाळून टाकले. यामध्ये गावातील पोलीस पाटील जनार्दन उबाळे, सुमीत भालेराव, अशोक मालकर, वैजनाथ कोकणे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु दोषीँवर अद्याप कारवाई झालेली नाही.

या आरोपींना अंमलदार मुळे, खुलताबादचे पोलीस निरीक्षक वाचवित असल्याचा आरोप त्यांन केला. या दोषींवर ऑटॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, दोषींविरुद्ध कडक कारवाई, झालेल्या नुकसानीची पंचनामा करावा, झालेले नुकसान आरोपंकडून वसूल करावे, परिवाराला राहण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू केले होते. मात्र, तब्बल ७८ दिवस उपोषण करूनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी आत्महदन करण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे संताप झालेल्या बिरसने दाम्पंत्याने शुक्रवारी (दि.१३) दुपारी साडेचार वाजता आत्मदहनाचा प्रयत्न केला. शोभा राजूू बिरसने या महिलेने अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ धाव घेत त्यांना आत्महदनापासून रोखले. शोभा बिरसने यांना रोखल्यानंतर राजू बिरसने यांनी स्वत:त्या अंगावर डिझेल टाकले. दोषींवर कारवाई होत नाही. आमचे कुटुंब उघड्यावर आले. आता वाचून तरी काय करायचे असे म्हणते त्यांनीही पेटविण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथे तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांनाही रोखले.


पोलिसांनी काढली समजूत

सीटीचौक पोलीस ठाण्याला तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे काही वेळात मोठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. सिटीचौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी बिरसने कुटुंबियांची समजूत काढली. तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बिरसने कुटुंबियांचा संताप कमी झाला. सायंकाळी पावणे सहा वाजता पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी बिरसने कुटुंबियांची अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांची भेट घालून दिली. त्या ठिकाणी त्यांनी आपली कैफियत मांडली. परंतु जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा बिरसने कुटुंबियांनी दिला.

Read About : Bengaluru Seven Murders- कौटुंबिक वादातून कॅब चालकाने पत्नीसह 7 जणांना संपवले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.