Ad Advertisement Ad Advertisement

Farmer Suicide Family Financial Assistance आत्महत्त्याग्रस्त 6 शेतकरी कुटुंबांनाप्रत्येकी 12 हजार रुपयांची मदत !


शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन’चे औदार्य

छत्रपती संभाजीनगर : Farmer Suicide Family Financial Assistance – दुष्काळामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला असून, ‘रब्बी’ वरही पाणी फेरले आहे. या दोन्ही हंगामातील पिकांवर चरितार्थ अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांची दयनीय अशी अवस्था झाली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणा या विवंचनेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. तरुण शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या ‘शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन’ यांच्याकडून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सहा शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी बारा हजार रुपये देऊन मदत करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीतून संकलित निधी वितरीतही करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील शेतकरी

सामाजिक कार्यकर्ते ॲड. विष्णू ढोबळे, रंजन दाणी, डॉ. गौतम साळवे, के. सी. गाडेकर, श्रेयस दाणी यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मुरुमखेडा येथील विजय गोविंदराव बचाटे या तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या केली. त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलांना ही मदत देण्यात आली. फुलंब्री तालुक्यातील गिरसावळी येथील विष्णू गाडेकर, धानोरा येथील तुळशीराम साळुंके, बाबरा येथील गणेश पवार, फुलंब्री गावातील दत्तू राऊत यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.


बहुतांश ‘अल्पभूधारक’

फुलंब्री तालुक्यातील विलास आणि रमाबाई जमधडे या दाम्पत्याने मागील वर्षी आत्महत्या केली. एक एकर शेतीवर अवलंबून असलेल्या जमधडे कुटुंबावर कर्ज होते. त्यांची दोन मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लहान मुलगा सिद्धांत जमधडे याच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली. आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. दोन एकरपेक्षा कमी क्षेत्रावर कुटुंबाची गुजराण शक्य नाही. मजुरी आणि शेतीतून ते चरितार्थ चालवतात. यावर्षी पाऊस झाला नसल्याने शेती पिकली नाही आणि मजुरीही मिळत नाही. हताश शेतकरी आत्महत्या करीत आहेत’, असे ॲड. विष्णू ढोबळे यांनी सांगितले.


Read About : Sugarcane Price 4200 Rupees – उसाला प्रतिटन 4,200 रुपये भाव द्या, अन्यथा सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.