गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्वाळा
गुवाहाटी : PAN Card and Voter ID Citizenship Proof केवळ पॅन कार्ड आणि मतदार फोटो ओळखपत्रावरून (ईपीआयसी) भारतीय नागरिकत्व सिद्ध करता येत नाही. तसेच या कागदपत्रांच्या आधारे कोणत्याही कौटुंबिक नातेसंबंधाची पुष्टीही केली जाऊ शकत नाही. यासाठी ज्या मूळ पुराव्यांच्या आधारे ही कागदपत्रे जारी केली गेली आहेत. ते पुरावे असणे आवश्यक आहे, असे गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. याचवेळी न्यायालयाने दरांग जिल्ह्यातील रहिवासी कुलचन बेगम यांना विदेशी घोषित करणारा विदेशी न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे.
कुलचन बेगम यांनी मंगलदई येथील एका विदेशी न्यायाधिकरणाच्या २०१८ मधील आदेशाला आव्हान दिले होते. ज्यात त्यांना २५ मार्च १९७१ नंतर भारतात प्रवेश केलेली विदेशी नागरिक घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती कल्याण राय सुराणा आणि न्यायमूर्ती सुष्मिता फुकन खौंड यांच्या खंडपीठाने सुनावणी करीत म्हटले की, कुलचन बेगम यांनी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वडिलांचे पॅन कार्ड व मतदार ओळखपत्र तसेच स्वत:चे मतदार ओळखपत्र आदींचा आधार घेतला होता.
मात्र, ही कागदपत्रे त्यांचे नागरिकत्व किंवा त्यांच्या कथित पालकांशी असलेले त्यांचे नाते सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाहीत. ही कागदपत्रे आयकर विभाग आणि भारतीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही औपचारिक चौकशीशिवाय केवळ अर्जाच्या आधारे जारी केली जातात. त्यामुळे जोपर्यंत पॅन कार्ड आणि ईपीआयसी जारी करण्यास आधारभूत ठरलेल्या मूळ नोंदी प्रमाणित केल्या जात नाहीत, तोपर्यंत सादर केलेली ही कागदपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाहीत, असे खंडपीठाने म्हटले आहे.
वडील भारतीय नागरिक
आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी १९६६ आणि १९७० च्या मतदार याद्या, वडिलांचे पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र, स्वत:चे मतदार ओळखपत्र, कुटुंबाचे रेशन कार्ड, २०१८ ची मतदार यादी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) अर्जाची पोचपावती कुलचन बेगम यांनी दाखवली. वडील भारतीय नागरिक होते. त्यांचे नाव मतदार याद्यांमध्ये होते. वडिलांनी २००९ मध्ये बारपेटा येथून लोकसभा आणि २०११ मध्ये बागबर येथून आसाम विधानसभा निवडणूकही लढवली. याशिवाय ते २०१३ मध्ये गुवाहाटी महानगरपालिकेचे निवडून आलेले नगरसेवकही होते, असा युक्तिवाद बेगम यांनी केला; परंतु तो न्यायालयाने फेटाळला.
महत्वाचे मुद्दे
Read About : Bombay High Court Abetment of Suicide Case – पती-पत्नीतील भांडणातील शब्द गुन्ह्याशी जोडता येणार नाहीत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.