नेटवर्क नसलेल्या भागांत ऑफलाइन नोंदणीचीही सुविधा
मुंबई : Maharashtra E-Peek Pahani Deadline शेतकऱ्यांची मागणी आणि मोबाईल नेटवर्कअभावी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ई-पीक पाहणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नेटवर्क नसलेल्या भागांतील शेतकऱ्यांना आता ऑफलाइन पद्धतीनेही पीक नोंदणी करता येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली.
राज्यातील तीन कोटी ४५ लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत तीन कोटी २० लाख शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २५ लाख शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी शासनाकडून परिपत्रक जारी करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ई-पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. तसेच पीक विमा कंपन्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या तक्रारी आगामी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मांडण्यात येणार असून, दुष्काळाचे पंचनामे कंपन्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पीक विमा प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सिमेंट रस्त्यांऐवजी शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य
दुष्काळी परिस्थितीत यंदा जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून सिमेंट रस्त्यांची कामे स्थगित करून शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेला गती देण्यासाठी राज्यातील सुमारे १२५ विधानसभा मतदारसंघांत आमदारांच्या अध्यक्षतेखाली सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित आमदारांनी तातडीने बैठका घेऊन शेतरस्त्यांची कामे सुरू करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या कामांसाठी डीपीसी व आमदार निधीचा वापर करून त्याला व्ही.बी. रामजी योजनेची जोड दिली जाणार आहे.
१५ डिसेंबरपर्यंत बोअरवेलला परवानगी
दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा उत्पादकांसह फळबागायतदार अडचणीत आले आहेत. नागपूर, विदर्भासह राज्यातील संत्री, मोसंबी, चिकू, आंबा आदी फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल करण्याची परवानगी देण्यात आली असून, यापूर्वी बोअरवेलवर असलेली स्थगिती उठवण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
महत्वाचे मुद्दे
Read About : Eknath Shinde Jalna farmer visit – शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.