Ad Advertisement Ad Advertisement

Eknath Shinde Jalna farmer visit – शेतकऱ्यांनो, धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना तालुक्यात शेतकऱ्याच्या घरी केले जेवण

जालना : Eknath Shinde Jalna farmer visit : शेतकऱ्यांनो, दुष्काळाचे संकट मोठे आणि गंभीर असले तरी आपण सर्वजण मिळून त्यावर मात करू. मात्र, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. केंद्र आणि राज्य सरकारसह शिवसेना तुमच्या पाठीशी ताकदीनिशी उभी असल्याचा दिलासा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी जालना तालुक्यातील भिलपुरी येथे अंबादास तांगडे या शेतकऱ्याच्या घरी दिवाळी साजरी करून त्यांचा पाहुणचार घेतला. बेसन, बाजरीची भाकरी आणि ठेच्याचे जेवण करून संपूर्ण शेतकरी कुटुंबाशी त्यांच्या अडीअडचणींबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना धीर राखण्याचा सल्ला देत सरकार व शिवसेना पाठीशी असल्याची ग्वाही देखील दिली. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्य विधिमंडळ अंदाज समितीचे चेअरमन तथा आमदार अर्जुनराव खोतकर, खा. संदीपान भुमरे, आ. हिकमत उढाण, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी भिलपुरी (ता. जालना) येथे आगमन होताच त्यांचे तांगडे कुटुंबीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी तांगडे कुटुंबातील वयोवृद्ध आजींसह घरातील मंडळींसोबत गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी, ख्यालीखुशाली विचारत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बाजरीची भाकरी, बेसन, ठेच्याचा घेतला आस्वाद

यावेळी तांगडे कुटुंबाने उपमुख्यमंत्र्यांना अस्सल ग्रामीण बाजरीची भाकरी, बेसन, ठेचा असा जेवणाचा बेत आखला होता. शिंदे यांनीही शेतकरी कुटुंबाने मोठ्या आदराने वाढलेल्या जेवणाचा आस्वाद घेत घरातील लाडक्या बहिणींना साडीचोळी तर पुरुष व मुलांना कपडे भेट देत भाऊबीजही साजरी केली.

तांगडे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

तांगडे कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेनेने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील ज्या घरात उपवर मुली आहेत, त्यांच्यासाठी सामूहिक विवाह आयोजित करून या मुलींचे लग्न करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Read About : Devendra Fadnavis celebrates Diwali with farmers – सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी : मुख्यमंत्री
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.