Ad Advertisement Ad Advertisement

Sambhajinagar Water Project Loan – पाणी योजनेच्या 193 कोटींच्या कर्जावर 1.23 कोटी व्याज

रेपोदरात वाढ झाल्याचा महापालिकेला आर्थिक फटका

छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Water Project Loan : २७४० कोटी रुपयांच्या शहर पाणी योजनेत स्वहिस्सा टाकण्यासाठी ८२२.२२ कोटी रुपयांचे कर्ज महापालिकेने हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून घेतले आहे. त्यावर सुरवातीला ८.७५ टक्के व्याजाचा आकारणी केली जात होती, पण रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ झाल्यामुळे ०.१५ टक्के व्याज वाढविण्यात आले आहे. त्याचा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे. सध्या उचललेल्या १९३ कोटीच्या रकमेवर वर्षाकाठी १ कोटी २३ लाख रुपयांचे व्याज महापालिकेला भरावे लागणार आहे.

केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शहराची २७४० कोटी रुपायांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. त्यात केंद्र शासनाचा हिस्सा ६८५.१९ कोटी, राज्याचा १२३३.३४ कोटी तर महापालिकेचा ८२२.२२ कोटी रुपये एवढा हिस्सा आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासनाने ८२२.२२ कोटी रुपयांचे कर्ज हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीकडून उपलब्ध करून दिले आहे. या कर्जाचा हप्ता २०२८ पासून सुरू होणार आहे. असे असले तरी उचल केलेल्या रकमेवर व्याज भरावे लागणार आहे. आतापर्यंत महापालिकेने ८२२.२२ कोटीपैकी १९३ कोटी रुपये घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मागणीनुसार कंत्राटदाराला दिले आहेत.

दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरात वाढ झाल्याने हुडको व महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीने ०.१५ टक्क्यांनी व्याज वाढविण्यात आले आहे. ८.९० टक्के एवढ्या व्याज दरवाढीला शुक्रवारी (दि. १३) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. ०.१५ टक्के दराने व्याज वाढले असल्याने सध्या घेतलेल्या १९३ कोटींच्या रकमेवर वर्षाला तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांचे व्याज वाढणार आहे.

२०२८ पासून सुरू होणार हप्ता

आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेवर ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. यापूर्वीच महापालिकेने स्मार्ट सिटीचा स्वहिस्सा भरण्यासाठी २५० कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते. या कर्जाचा हप्ता फेडताना नाकीनऊ येत असताना ८२२.२२ कोटी रुपयांच्या कर्जाचा २०२८ पासून महिन्याला किमान १० कोटी रुपयांपर्यंत दरमहा हप्ता भरावा लागणार आहे.

Read About: Anirudh Ravichander Wedding – ग्रीसमधील विवाहानंतर अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारनचे चेन्नईत जल्लोषात स्वागत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.