Ad Advertisement Ad Advertisement

Hyperspectral Imaging Technology – आता प्रकाशाच्या मदतीने नकली औषधांचा पर्दाफाश

गुरुग्रामच्या कंपनीचा दावा : चाचण्यांत हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग तंत्राला यश

गुरुग्राम (हरयाणा) : Hyperspectral Imaging Technology – बाजारात मिळणारी औषधी गोळी अस्सल की भेसळयुक्त हे आता गोळी न फोडता केवळ प्रकाशाच्या सहाय्याने ओळखता येईल, असा दावा ‘भारतरोहन एअरबोर्न इनोव्हेशन्स’ या कंपनीने केला आहे. स्वत:च्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांत आपल्या ‘हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग’ तंत्रज्ञानाला चांगले यश मिळाल्याचे कंपनीने सांगितले.
आपल्या डोळ्यांना दिसणाºया प्रकाशाबरोबरच डोळ्यांना न दिसणाºया प्रकाशाच्या अनेक छटा असतात. प्रत्येक पदार्थ या छटांना वेगवेगळा प्रतिसाद देतो. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जणू स्वत:ची एक ‘प्रकाश-ओळख’ तयार होते. खास कॅमेºयाने ही ओळख टिपली की गोळीत नेमके काय आहे याचा अंदाज बांधता येतो. यात गोळी फोडावी किंवा नष्ट करावी लागत नाही. हेच तंत्रज्ञान ही कंपनी सध्या ड्रोनच्या मदतीने शेतीच्या पाहणीसाठी वापरते. आता त्याचा उपयोग औषधांची अस्सलता तपासण्यासाठी करता येईल का, याची चाचपणी कंपनी करत आहे.

चाचण्यांत काय आढळले?

कंपनीने वेदनाशामक व तापाच्या गोळ्या तसेच प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स), मधुमेहाच्या गोळ्यांसह अ‍ॅलर्जी आणि दम्याच्या औषधांवर प्रयोग केले. या गोळ्यांमध्ये खडू, स्टार्च, टाल्क पावडर, जिप्सम व लॅक्टोज यांसारख्या पदार्थांची कमी-जास्त प्रमाणात भेसळ करून पाहण्यात आली. ३० टक्के भेसळ असलेल्या गोळ्या खºया गोळ्यांपेक्षा वेगळ्या ओळखता आल्या. शिवाय कोणत्या पदार्थाची भेसळ आहे, हेही वेगळे ओळखता आले. भेसळ जितकी वाढते तितका प्रकाशाच्या संकेतांतील बदलही वाढतो, असे सुरुवातीच्या निष्कर्षांत दिसले. त्यामुळे भेसळ आहे की नाही एवढेच नव्हे, तर ती किती प्रमाणात आहे याचाही अंदाज भविष्यात बांधता येईल, अशी कंपनीला आशा आहे.

पण अजून खूप पल्ला बाकी

हे निष्कर्ष कंपनीच्या मर्यादित अंतर्गत चाचण्यांवर आधारित आहेत, हे कंपनीनेच स्पष्ट केले आहे. बाहेरच्या स्वतंत्र संस्थेने याची पडताळणी केलेली नाही. शास्त्रज्ञांनी याचा आढावा घेतलेला नाही आणि सरकारी नियामक संस्थांची मान्यताही मिळालेली नाही. देशातील काही नियामक आणि वैज्ञानिक संस्थांशी चर्चा सुरू असल्याचे कंपनी सांगते. मात्र या चर्चा कोणाशी आणि कोणत्या टप्प्यावर आहेत, हे कंपनीने उघड केलेले नाही. पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय हे तंत्र बाजारात आणणार नाही, असे कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमनदीप पनवार यांनी सांगितले. हे तंत्र प्रयोगशाळेतील सध्याच्या चाचण्यांची जागा घेणार नाही, तर त्यांना पूरक ठरेल, असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञान यशस्वी झाले तर मोठा लाभ

बनावट आणि भेसळयुक्त औषधे हा आरोग्यासाठी मोठा धोका आहे. गोळी न फोडता झटपट तपासणी करणारे तंत्र खरोखर यशस्वी झाले, तर औषध कंपन्या, प्रयोगशाळा आणि सरकारी तपास यंत्रणांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

Read About : Gene Editing for Heart Disease – हृदयरोगावर एकदाच उपचार शक्य? आयुष्यभर औषधे घेण्याची गरज कमी होण्याची आशा E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.