Ad Advertisement Ad Advertisement

Latur Air Pollution – लातूरची हवा शुध्द होण्याचे नाव घेईना

उपाययोजना कुचकामी, प्रभावी उपायांची गरज

लातूर Latur Air Pollution : दिवाळीपासून लातूर शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढतच आहे. दिवाळी संपली तरी हवा शुध्द होण्याचे नाव घेत नाही. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण नगण्य असल्याने दुपारच्या वेळी हवा गुणवत्ता निर्देशांक थेट २१७ च्या पुढे सरकत आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजन व पाडवा पूजनावेळी हा निर्देशांक तब्बल ४१४ वर पोहोचला होता. शहराचा निर्देशांक साधारणपणे ६६ पर्यंत असतो. तो ५० पर्यंत असणे गरजेचे आहे.

शहराची हवा देशातील पहिल्या दहांमध्ये अशुध्द होती. त्यामुळे फुफुसाचे आजार जडू लागले होते. हवा शुध्द करण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना राबवून लातूरची हवा शुध्द करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदाही झाला. परंतु, आता दिवाळीनंतर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. अशातच दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यात उंच उडणारे, जास्त धूर होणाऱ्या फटाक्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याने लातूरची हवा अशुध्द झाली. तिचा गुणवत्ता निर्देशांक थेट ४१४ पर्यंत गेला होता. हे प्रमाण अतिशय घातक आहे. दिवाळी संपल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्याची आशा आहे. परंतु, अद्यापही २१७ पर्यंत दिवसभरातील हवेचा निर्देशांक राहत आहे. हे प्रमाण मानवी शरीरास घातक असेच आहे.

दिवाळीनंतर वातावरणात गारवा वाढला आहे. यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण २५ पेक्षा खाली आले आहे. आर्द्रतेअभावी धुलीकण हवेत मिसळून हवा अशुध्द करतात. अशातच दिवाळीचे फटाके फोडण्याचे प्रमाण सुरूच आहे. परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाढतच आहे. शनिवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास तो २१६ च्या पुढे गेला होता. तर सायंकाळच्या सुमारास थोडा खाली येत तो १५८ झाला होता. हवेचे वाढते प्रदूषण हे लातूरकरांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. हे प्रमाण खाली येऊन हवा शुध्द राहण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनीही कमी धूर होणाऱ्या फटाक्यांच्या वापर करणे गरजेचे आहे.

शहरात हिवाळ्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. अशातच दिवाळीच्या सणामुळे प्रचंड धुराचे फटाके फोडण्यात येत आहेत. त्याच्या धुराचे प्रचंड प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक व्यापारी, नागरिक, घरासमोरील रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा पेटवून देतात, त्यामुळे प्रचंड धूर होतो. त्याचप्रमाणे थंडीमुळे शेकोट्याही वाढल्या आहेत. शेकोट्या व कचरा जाळण्यावर बंधने आणणे गरजेचे आहे.
– देविदास जाधव,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read About: Anirudh Ravichander Wedding – ग्रीसमधील विवाहानंतर अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारनचे चेन्नईत जल्लोषात स्वागत

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.