Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Farmer ID Registration- शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा! – 2026

५० लाख शेतकऱ्यांना अग्रीमपासून वंचित राहिल्याने मदत व पुनर्वसन विभागाचे आवाहन

मुंबई : Maharashtra Farmer ID Registration राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच अन्य विभागांच्या योजनांचा लाभ थेट मिळावा, यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कृषी व अन्य विभागांच्या विविध योजनांची मदत शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यातील ३३ टक्क्यांहून अधिक पीक नुकसान झालेल्या सुमारे दीड कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपयांची अग्रीम मदत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)द्वारे दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली होती. यासाठी राज्य सरकारने ७.५ हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, ई-केवायसी व फार्मर आयडी नसल्याने अद्यापही सुमारे ५० लाख शेतकरी या मदतीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

मदत व पुनर्वसन विभागाने दिवाळीपर्यंत ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४,३७३ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. मात्र, अद्याप ३३ टक्के शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम पोहोचली नाही. आधार कार्डमधील तफावत, चुकीचे बँक खाते क्रमांक आणि ई-केवायसीमधील तांत्रिक त्रुटींमुळे उर्वरित ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शासन पातळीवर या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू आहे.

नागरी सुविधा केंद्रात जा

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत मिळण्यासाठी ई-केवायसी व ॲग्रीस्टॅक प्रणालीवरील फार्मर आयडी आवश्यकच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करण्यासाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात आधार कार्ड व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकासह जाऊन फार्मर आयडी तयार करून घ्यावा. राज्यातील शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

१ कोटी शेतकऱ्यांपर्यंतच मिळणार अग्रीम मदत?

ॲग्रीस्टॅक प्रणालीवर महाराष्ट्रातील १ कोटी ३५ लाख ६६ हजार २८० शेतकऱ्यांची नोंदणी (फार्मर आयडी) झाली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित झालेल्या पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याचा लाभ महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक फार्मर आयडीला जोडले नसल्याने किंवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सुमारे ३० ते ३५ टक्के शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त देण्यात आलेली अग्रीम रक्कम मिळू शकली नसल्याचे कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सर्वांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण होण्याची शक्यता कमीच असून, साधारणपणे अंतिमत: १ कोटीच्या आसपासच शेतकऱ्यांना ५ हजारांची अग्रीम रकमेची मदत मिळू शकेल, असा दावा या अधिकाऱ्याने केला.

Read About : Maharashtra E-Peek Pahani Deadline – ई-पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.