Ad Advertisement Ad Advertisement

Panchaleshwar Jain Deepotsav – पांचालेश्वर येथे भक्तिभावात दीपोत्सव साजरा

दीपप्रज्वलन आणि विविध धार्मिक आरत्यांच्या मंगलमय वातावरण

छत्रपती संभाजीनगर : Panchaleshwar Jain Deepotsav श्री १००८ नंदिश्वर दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, पांचालेश्वर येथे दीपप्रज्वलन आणि विविध धार्मिक आरत्यांच्या मंगलमय वातावरणात दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भाविक कुटुंबांसह पाचोड बाल मंडळाला आरतीचा मान देण्यात आला. श्री नंदिश्वर दीपाची प्रथम आरती करण्याचा मान छत्रपती संभाजीनगर येथील रमेशकुमारजी, रितेशकुमारजी आणि सौरभकुमारजी बडजातें परिवाराला मिळाला. द्वितीय श्री १००८ पद्मप्रभू भगवान यांची आरती पाचोड बाल मंडळाने केली. तृतीय आरतीचा मान जयकुमारजी, सुयोगजी, अक्षयजी आणि दिव्यम बाकलीवाल परिवाराला मिळाला. चतुर्थ श्री १००८ पार्श्वनाथ भगवान यांची आरती अजितचंदजी, राजेंद्रकुमारजी, संजयजी, सम्यक आणि तनिष सेठी परिवाराने केली. पंचम श्री क्षेत्रपाल बाबांची आरती राजूजी आणि हर्षल काळा परिवाराने केली.

या सोहळ्यात जैन धर्मातील संस्कार, परंपरा आणि नव्या पिढीमध्ये धार्मिक मूल्यांची रुजवणूक करण्याचा संदेश देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, बीड, गेवराई, पाचोड, पैठण, विवाहमांडवा, राक्षसभुवन आणि उमापूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपोत्सवाच्या आयोजनासाठी अध्यक्ष गौतमचंद काला, सचिव भाऊसाहेब बाकलीवाल यांच्यासह विश्वस्त व कार्यकारी मंडळाने सहकार्य केले. दीपमालिका कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जैन क्रांती मंचचे विशेष सहकार्य लाभले. सर्व आरती मानकरी परिवारांचे उपस्थितांनी अनुमोदन केले. अशी माहिती नरेंद्र अजमेरा आणि पियुष कासलीवाल यांनी दिली.

Read About : NPCI UPI Merchant Incentive Scheme – यूपीआय व्यवहारांवर मिळणार आर्थिक लाभ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.