Ad Advertisement Ad Advertisement

Parbhani Jaltara Recharge Pits – परभणी जिल्हा प्रशासन 25 हजार जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती करणार

पालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश, ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

परभणी Parbhani Jaltara Recharge Pits : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूजलपातळी वाढविणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याला १ लक्ष जलतारा खड्ड्यांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात २५ हजार जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत. त्याचबरोबर पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

जिल्ह्यातील पीक परिस्थिती, चारा उपलब्धता, संभाव्य दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पाणीपुरवठा, स्वच्छता, जलतारा शोषखड्डे, रोजगार उपलब्धता आणि जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार जलतारा शोषखखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक गटविकास अधिकाऱ्याने किमान २५ जलतारा शोषखड्डे तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वत:च्या निवासस्थानी आणि कार्यालय परिसरात शोषखड्डे तयार करून या मोहिमेचा प्रारंभ करावा. नागरिकांचाही सहभाग वाढवून ही मोहीम लोकचळवळ बनवावी, असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी शोषखड्ड्यांचे प्रस्ताव अपलोड करावेत. तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. व्हीबी-जी रामजी योजनेतूनही ही कामे घेण्याचे नियोजन करावे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी साठवण व भूजल पुनर्भरणाला गती द्यावी. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून पाणीपातळीतील बदलांवर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत जिल्ह्यातील शहरांमध्ये घनकचरा संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची व्यवस्था सक्षम करावी. जिल्ह्यातील आठ नगर परिषदांमध्ये घंटागाड्या, ट्रॅक्टर आणि आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करावी. जिंतूर येथील वीजपुरवठ्याची अडचण, पाथरीतील यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि पूर्णा येथील वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. गंगाखेडमधील निविदा प्रक्रियेला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. परभणी शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी किमान १० एकर जागेची आवश्यकता असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

शाळा, अंगणवाडी आणि रुग्णालयांच्या स्वच्छतेची प्रत्यक्ष तपासणी करा

शाळा, अंगणवाडी आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रीय भेटी द्याव्यात. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता यांचे स्वतंत्र नियोजन करावे. मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांच्या कामांमधील प्रलंबित त्रुटी पुढील आठवडाभरात दूर कराव्यात. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये. अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री आढावा न घेता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कामांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

पाणीटंचाई कृती आराखडा तयार करा

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्रोतांची स्थिती आणि भविष्यातील गरज यांचा आढावा घेऊन कृती आराखडा तयार करावा. टंचाईग्रस्त गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी ठेवावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही यावेळी आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला. परभणी शहरातील अनधिकृत नळजोडण्या पुढील १५ दिवसांत बंद कराव्यात. ज्या नागरिकांना नळजोडण्या नियमित करून घ्यायच्या आहेत, त्यांच्याकडून आवश्यक नळपट्टी भरून घेऊन नियमानुसार नियमितीकरण करावे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Read About : Why Glue Does Not Stick to Bottle – डिंक स्वतःच्याच बाटलीला का चिकटत नाही? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.