Ad Advertisement Ad Advertisement

MSEDCL Fake Recruitment Advertisement – महावितरणच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न

तरुणांना सावध राहण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : MSEDCL Fake Recruitment Advertisement – महावितरणमध्ये २३ हजारांहून अधिक पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती केली जात असल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी आणि आकर्षक वेतनाचे आमिष दाखवून दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, या जाहिराती पूर्णपणे बनावट असून त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये. भरतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, सोशल मीडियावरून मिळणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा वैयक्तिक माहिती व पैसे देणे टाळावे. महावितरणच्या सर्व अधिकृत भरती जाहिराती, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया केवळ महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. ऑनलाइन अर्जाची लिंकदेखील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे कोणत्याही भरतीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर खात्री करा. बनावट जाहिरातींपासून सावध राहा, आर्थिक फसवणूक टाळा आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read About : Potters Free Clay Royalty – पिढीजात कुंभारांना वर्षाला 700 ब्रास माती मोफत रॉयल्टीवर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.