Ad Advertisement Ad Advertisement

Yeh Prem Mol Liya Trailer – लग्नानंतर नवरा राहणार बायकोच्या घरी, आयुष्मान – शर्वरीच्या ‘ये प्रेम मोल लिया’ ट्रेलर प्रदर्शित

सूरज बडजात्या यांची वेगळ्या विषयावरील कौटुंबिक प्रेमकहाणी, २७ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार

मुंबई : Yeh Prem Mol Liya Trailer – लग्न झाल्यानंतर मुलीनेच सासरी जाऊन राहायचे, असा आजवरचा प्रघात आहे. मात्र, लग्नानंतर नवरा बायकोच्या घरी राहायला गेला तर? ऐकायला थोडे वेगळे वाटत असले, तरी याच कल्पनेवर आधारित ‘ये प्रेम मोल लिया’ या नव्या चित्रपटाची कथा आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री शर्वरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

प्रेम, कुटुंब आणि नात्यांना महत्त्व

प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज आर.बडजात्या यांनी या चित्रपटातून लग्न आणि कौटुंबिक नात्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच प्रेम, कुटुंब आणि नात्यांना महत्त्व दिले जाते. मात्र, यावेळी त्यांनी पारंपरिक लग्नपद्धतीपेक्षा वेगळा विषय निवडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना पत्नीच्या घरी राहायला जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. साधारणपणे लग्नानंतर मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला जाते. मात्र, या चित्रपटात ही परंपरा बदललेली दिसते. संसारात केवळ नवऱ्यानेच निर्णय घ्यायचे असे नाही, तर पत्नीचे मत आणि तिच्या इच्छांनाही तितकेच महत्त्व असायला हवे, असा विचार यातून मांडण्यात आला आहे.

‘अगर इतना भी नहीं किया तो क्या प्यार किया?’

लग्नानंतर मुलीने माहेर आणि सासर यापैकी एकाची निवड करण्याची गरज नाही. दोन्ही कुटुंबांना सोबत घेऊनही आनंदाने संसार करता येतो, हा संदेशही चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही केवळ प्रेमकथा नसून बदलत्या काळातील लग्नसंस्था आणि कौटुंबिक नात्यांवर भाष्य करणारी कथा ठरणार आहे. ट्रेलरमध्ये आयुष्मान आणि शर्वरी यांची जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. दोघांमधील प्रेम, गोड भांडणे आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी पाहायला मिळते. ‘अगर इतना भी नहीं किया तो क्या प्यार किया?’ हा चित्रपटातील संवादही लक्षवेधी ठरतो. प्रेम म्हणजे केवळ एकत्र राहणे नाही, तर एकमेकांच्या इच्छा आणि कुटुंबाचाही आदर करणे आहे, अशी भावना यातून व्यक्त होते.

गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती

चित्रपटाचे संगीत हिमेश रेशमिया यांनी दिले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेषत: ‘झुमका पटोला’ या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या गाण्याने दहा लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्यासोबत अनुपम खेर, सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, सौम्या टंडन, स्वानंद किरकिरे, श्रुती सेठ, शाद रंधावा, गिरीश कुलकर्णी आणि राजेश कुमार यांच्याही भूमिका आहेत.

राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सूरज आर. बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Read About: Call Me Bae Season 2 – ‘दोन प्रेमी, एक बे!’ अनन्याच्या आयुष्यात पुन्हा रंगणार लव्ह ड्रामा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.