Ad Advertisement Ad Advertisement

Municipal Pm Svanidhi Award Third Rank – पीएम स्वनिधी योजनेत छत्रपती संभाजीनगर मनपाचा तिसरा क्रमांक

दिल्लीत पार पडला पुरस्कार समारंभ : महापालिकेने ३२,५८२ पथविके्रत्यांना दिला लाभ

छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Municipal Pm Svanidhi Award Third Rank: महानगरपालिकेने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत स्वनिधी सन्मान अवॉर्ड २०२६ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी (दि.२०) झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते आयुक्त अमोल येडगे व उपायुक्त अपर्णा थेटे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात ‘पीएम पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ ही योजना राबविण्यात येते. या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा उद्देश कोविड-१९ महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचे व्यवसाय पुन्हा उभे करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मार्च २०२६ पर्यंत ३२,५८२ पथविक्रेत्यांना प्रथम कर्जाचा लाभ देऊन या योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महानगरपालिकेने प्रथम कर्ज वितरणाचे केंद्र सरकारने दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केलेले आहे.

मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त अपर्णा थेटे तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत (एनयूएलएम) कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पथविक्रेत्यांचे आर्थिक सक्षमीकरण, व्यवसाय वृद्धी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महानगरपालिका यापुढेही प्रभावीपणे कार्यरत राहणार आहे., अशी ग्वाही आयुक्त येडगे यांनी यावेळी दिली.

१५ ते ५० हजारांपर्यंत मिळते कर्ज

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत तीन टप्प्यात पथविक्रेत्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये विनातारण कर्ज दिल्या जाते. हे कर्ज बारा महिन्यात फेडावे लागते. हे कर्ज फेडल्यास दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये (परतफेडीचा कालावधी १८ महिने) आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये (परतफेडीचा कालावधी ३६ महिने) कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे कर्जाची परतफेड केल्यास वर्षाला ७ टक्के अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाते.

विविध वस्तू विक्री करणारे पथविक्रेते ठरतात पात्र

शहरी भागात भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, कपडे यासह विविध वस्तू विक्री करणारे पथविके्रते या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पथविक्रेत्याला अर्जासोबत आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, महापालिकेचे विक्री प्रमाणपत्र आवश्यक आहे.

Read About : Rain Water Harvesting – सर्व इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.