Ad Advertisement Ad Advertisement

Sambhajinagar Government Medical College – संभाजीनगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यात अव्वल

शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त

छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar Government Medical College – राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या कामगिरीत छत्रपती संभाजीनगरने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ऑक्टोबर २०२६ महिन्याच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ८३.६ गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. दहा निकषांवर आधारित १०० गुणांच्या संयुक्त कामगिरी निर्देशांकात महाविद्यालयाने ही कामगिरी केली. महाविद्यालयाने २.२ गुणांची वाढ नोंदवत थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. सप्टेंबरमध्ये ८१.४ गुण होते. तर दुसऱ्या क्रमांकावरील नागपूर महाविद्यालयाला ८०.२ गुण मिळाले आहेत.

सात निकषांमध्ये पैकीच्या पैकी गुण

दहा पैकी सात निकषांमध्ये महाविद्यालयाने प्रत्येकी १० पैकी १० गुण मिळवले आहेत. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, बेड ऑक्युपन्सीमधील वाढ, ऌटकर/रछउटर प्रणालीचा वापर, पदव्युत्तर अभ्यासक्रम विस्ताराचे नियोजन, सुपर स्पेशालिटी विभागांची कार्यक्षमता, रेडिओलॉजी तपासण्यांसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी आणि पॅथॉलॉजी तपासण्यांची उपलब्धता या बाबींचा समावेश आहे.

इतर महाविद्यालयांची कामगिरी

ऑक्टोबरच्या क्रमवारीत नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावतीला ४५.९, मुंबईला ४६.९, नाशिकला ४७.८ आणि वाशिमला ५१.८ गुण मिळाले आहेत. ही महाविद्यालये सुधारणा आवश्यक असलेल्या गटात आहेत. राज्याच्या एकूण कामगिरीत एनएबीएल मानांकन आणि सुपर स्पेशालिटी सेवांमधील त्रुटी ही आव्हाने असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे.

रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास नवी प्रेरणा

या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या संस्थेला राज्यातील पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय बनवण्याचा निर्धार केला होता आणि ते स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मिळालेला पहिला क्रमांक कायम राखणे हे आगामी काळातील मोठे आव्हान असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब असून, आगामी काळातही रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास या यशामुळे नवी प्रेरणा मिळणार आल्याचे त्यांनी सांगितले.

Read About : Journalists vs Reel Makers : रील बनवणारे पत्रकार नाहीत? दिल्ली पोलिसांचं सुप्रीम कोर्टात मोठं विधान
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.