सीबीआयची, इंटरपोलच्या सहकार्ऱ्याने छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई; ४९ लाखांची फसवणूक करून आरोपी झाला होता फरार
छत्रपती संभाजीनगर : Women Exploitation Accused Brought from Dubai लग्नाचे आमीष दाखवून अनेक महिलेसोबत शारीरिक संबंध स्थापन केल्यानंतर आणि त्यांच्याकडून तब्बल ४९ लाख रुपये उकळल्यानंतर विदेशात फरार झाले्ल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) आणि इंटरपोलच्या मदतीने संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणले आहे. मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद (३३, रा. काजीवाडा, भडकलगेट) असे या आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मागणीनुसार इंटरपोलने आरोपीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दुबईत वर्षभरापासून लपून राहणाऱ्या मोहम्मद माझीनला यूएईच्या अधिकाऱ्यांनी अटक करून आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई २० नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. एखाद्या गुन्ह्यात विदेशातून प्रत्यार्पण केल्याची पहिलीच घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतुलकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर विमानतळावर सिक्युरिटी ऑफीसर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद याने शहरातील एका ओळखीच्या महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केले. मात्र, नंतर लग्नास नकार दिला. या विरोधात संबंधित महिलेने सिटीचौक पोलीस ठाण्यात १ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून ॲटॅसिटीसह विविध कलमांन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तक्रार दाखल होत असल्याची कुणकुण लागताच प्रकरणील मुख्य आरोपी मोहम्मद माझीन मोहम्मद अब्दुल रशीद हा विदेशात पळून गेला.
सिटीचौक पोलिसांनी इतर दोन आरोपींना अटक केली होती. मात्र मोहम्मद माझीन याला अटक करता आली नव्हती. तो विदेशात पळून गेल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाकडून मोहम्मद माजीन याच्या प्रकरणात स्टँडिंग वॉरंटचे आदेश घेण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयच्या नवी दिल्ली येथील इंटरपोल विभागाने मोहम्मद माजीनविरोधात सुरुवातील लुक आऊट नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर इंटरपोलच्या समन्वयातून मोहम्मद माजीनचे ठिकाण शोधण्यात आले.
दुबई पोलिसांनी घेतले ताब्यात
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील आरोपी प्रत्यार्पण करारानुसार आरोपीला अबू धाबी पोलिसांनी दुबई येथे १९ नोव्हेंबर २०२६ ला ताब्यात घेतले. त्याची माहिती भारतीय केंद्रीय गृह मंत्रालय आणि विदेश मंत्रालय यांना देण्यात आली. मोहम्मद माजीनला अटक झाल्याची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, सिटीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे पोलीस अंमलदार सुरेश बोडखे आणि अमोल सोनटक्के यासाठी यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने संयुक्त अरब अमिरात देशातील विविध शासकीय यंत्रणा, सीबीआय, इटरपोल यांच्याशी समन्वय साधात मोहम्मद माजीन याला दुबई येथे जाऊन आरोपी प्रत्यार्पणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून ताब्यात घेतले. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दुबईहून विमानाने कोचीन येथे आणण्यात आले. कोचीन येथील न्यायालयात हजर करीत दोन दिवसांची टन्झीट रिमांड घेण्यात आली. त्यानंतर विमानाने मुंबई येथे आणल्यानतंर वाहनाने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले.
१४ दिवसांची पोलीस कोठडी
मोहम्मद माजीन याला तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्यासह सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मोहम्मद माजीन याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनेकांची आर्थिक फसवणूक
अशाच प्रकारे मोहम्मद माजीन लग्नाचे आमीष दाखवून अनेक महिलेचे लैंगिक आणि आर्थिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तर जणांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. अशा प्रकारे मोहम्मद माजीन याने ४९ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात संबंधित न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
फसवणूक झालेल्यांनी तक्रार द्या…….
मोहम्मद माजीन याला एका महिलेला लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. मोहम्मद माजीन याच्याकडून शहरातील अनेक जणांना गंडा घातल्याचे किंवा शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशा फसवणूक झालेल्या किंवा शोषण झालेल्या व्यक्ती, महिला यांनी सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील (गुन्हे) आणि सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्याशी साधून तक्रार नोंदवावी. तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पाठपुराव्याला यश
लैंगिक शोषण आणि आर्थिक शोषण करून आरोपी विदेशात पळून गेल्याचे दिसून येताच त्याच्या अटकेसाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. सीआयडी, महाराष्ट् पोलीस, सीबीआय यांच्याकडे मागील वर्षभरापासून पाठपुरावा सुरूच ठेवला. शेवटी या पाठपुराव्याला यश येऊन आरोपीला दुबईत अटक झाली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया करून भारतात आणण्यात आले. विदेशात पळून गेलेल्या आरोपीला अटक करून आणण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रवीण पवार
पोलीस आयुक्त
महत्त्वाचे मुद्दे
Read About: Cyber Movie 2026 – नोकरीच्या शोधात गेले अन सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.