nine forms of Goddess Durga : दयाळूपणा आणि धैर्याचा दिला संदेश
मुंबई : Actress Bhagyashree शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, अभिनेत्री भाग्यश्रीने चाहत्यांना दुर्गामातेच्या नऊ रूपांचे महत्त्व समजावून सांगितले आहे. मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर केली. त्यासोबतच नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत देवीच्या नऊ रूपांमधून मिळणाऱ्या संदेशाकडे चाहत्यांचे लक्ष वेधले.
भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मातेची नऊ रूपे म्हणजे नऊ भाव.’
देवीच्या नऊ स्वरूपांचे महत्त्व सांगताना तिने प्रत्येक रूपातून मिळणाऱ्या वेगवेगळ्या गुणांचा उल्लेख केला. शैलपुत्री- हे स्थैर्य, पवित्रता आणि निसर्गाशी असलेल्या दृढ नात्याचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणी- हे भक्ती, साधना आणि दृढ निश्चय दर्शवते. चंद्रघंटा- हे शांतता, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या तयारीचे प्रतीक आहे. तर कूष्मांडा- हे सर्जनशीलता, उबदारपणा आणि जीवनाला ऊर्जा देणाऱ्या प्रकाशाचे प्रतीक असल्याचे तिने सांगितले. स्कंदमाता – हे नि:स्वार्थ मातृत्व आणि संरक्षण देणाऱ्या प्रेमाचे प्रतीक आहे. कात्यायनी- धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक असलेले धैर्य आणि वाईटावर विजय मिळवण्याची शक्ती दर्शवते. कालरात्री अंधार, अज्ञान आणि नकारात्मकतेचा निर्भयपणे सामना करण्याचा संदेश देते. महागौरी- हे पवित्रता, अंत:शांती आणि आध्यात्मिक नवीकरणाचे प्रतीक आहे, तर सिद्धिदात्री- परमज्ञान, आध्यात्मिक सिद्धी आणि दिव्य पूर्णत्व दर्शवते.
दुर्गामातेच्या या नऊ रूपांमधून मिळणारा संदेश स्पष्ट करताना भाग्यश्रीने देवीच्या वात्सल्यासोबतच तिच्या न्यायासाठी लढण्याच्या सामर्थ्यावरही भर दिला. तिच्या मते, देवीमध्ये माया आणि करुणा आहे; मात्र संरक्षण आणि न्यायाची गरज भासते, तेव्हा ती सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते.
‘दयाळू असण्याचा अर्थ दुर्बल असणे असा नाही. कोमलता आणि धैर्य एकत्र नांदू शकतात,’ असा संदेशही भाग्यश्रीने आपल्या पोस्टमधून दिला.
दरम्यान, २०२६ मध्ये शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, १९ ऑक्टोबरला त्याची सांगता होणार आहे. २० ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी पांढरा किंवा पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. हे रंग शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जातात.
Nana Patekar : नाना गेले पण नाना संपले नाहीत
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.