नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा आठव्या दिवशी ठाण्यात रोखला; काही विद्यार्थी ताब्यात, काहींची प्रकृती खालावली
ठाणे – Adivasi Students Protest नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उलगुलान मोर्चा ला आठव्या दिवशी ठाणे हद्दीत पोलिसांनी अचानक अडवले. आदिवासी आश्रमशाळांमधील बिघडलेली शिक्षण व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हजारो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलकांचा दावा आहे कि, पोलिसांनी मध्यरात्री सुमारे एक वाजता विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास सांगितले आणि त्यानंतर ठाणे हद्दीत अचानक रोखून काहींना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांशी धक्काबुक्की झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या धावपळीमुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना भिवंडी बायपास येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे पालकांमध्ये आणि आदिवासी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्था तातडीने सुधारून तिथे दर्जेदार शिक्षण दिले जावे. तसेच, सध्या सुरू असलेली सेंट्रल किचनची जेवणाची व्यवस्था त्वरित बंद करून आश्रमशाळांच्या आवारातच ताजे, दर्जेदार आणि पौष्टिक भोजन तयार करण्यात यावे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि परिसरात सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी. या सर्व दुरवस्थेला जबाबदार धरून आदिवासी विकास विभागाचे मंत्री, आयुक्त आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
Read About: Earthquake Safety 2026 : भूकंपापासून संरक्षणासाठी हिंगोलीत STABLE तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.