सौर कृषी वाहिनी योजनेमुळे ८० टक्के पंपांना वीजपुरवठा
Agricultural Pump Electricity मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्दष्टिाच्या दिशेने महावितरणने मोठी मजल मारली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे राज्यातील ८० टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा होत असून, येत्या मार्चअखेर १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीज देण्याचे उद्दष्टि पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. नवी दल्लिी येथे आयोजित ‘भारत रन्यिूएबल एनर्जी समिट अँड एक्स्पो २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल ६५ टक्के पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. सौरपंपांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हवी तेव्हा वीज उपलब्ध होत असून, रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज कमी झाली आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यास आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होत आहे.
कृषिपंपांना दिवसा आणि रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये वीजपुरवठा करताना वीज वितरण कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सौरऊर्जेकडे वळल्यास या समस्या कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांना दर्जेदार वीज मिळेल आणि राज्य सरकारवरील वीज अनुदानाचा आर्थिक भारही कमी होईल, असे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले. वाढती औद्योगिक गुंतवणूक आणि विजेची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्राने भवष्यिातील वीज गरजांसाठी नियोजन केले असून, त्यात नवीकरणीय ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे.
१६ हजार मेगावॅटचे उद्दष्टि
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही केंद्राच्या पीएम-कुसुम योजनेच्या आधारे राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यात विकेंद्रित स्वरूपात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सात हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांमधून मिळणारी वीज आणि अन्य तांत्रिक उपाययोजनांमुळे ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीज देणे शक्य झाले आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Farmer Advance Payment – 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीमचे 5 हजार जमा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.