सुनियोजित निघृण हत्याकांडाने बेंगळुरू शहर हादरले
बेंगळुरू : Cab driver kills wife कर्नाटकची राजधानी बेंगळुरुत कौटुंबिक वादातून एका कॅब चालकाने आपल्या पत्नीची आणि तिच्या माहेरच्या सहा जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या निष्पाप बालकाचाही समावेश आहे. या सर्व हत्या गेल्या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या.
इंदूशेखर उर्फ शेखर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इंदुशेखरचे २० वर्षांपूर्वी सुनीतासोबत लग्न झाले होते. मात्र, सुनीता तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत संपर्कात राहत असल्याने या पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असत. वादानंतर सुनीताची आई व भाऊ तिचीच बाजू घेत असल्याने शेखरने पत्नीसह तिच्या माहेरकडील लोकांना संपवण्याच कट आखल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम घरात वरवंट्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह नंदी हिल्स परिसरात फेकला व ती सहलीला गेल्याचा बनाव रचला. त्यानंतर पुढील काही दिवसांत त्याने मेहुणे शिवकुमार व शंकर, त्यांच्या पत्नी अनुक्रमे दिव्या व नलिनी, सासू रूपावती आणि ७ वर्षांचा पुतण्या पुनीत यांना वेगवेगळ्या बहाण्याने घरी बोलावून संपवले. हत्येनंतर रक्ताचे डाग पुसण्यासाठी त्याने रसायनांचा वापर केला होता. नलिनी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीलाही मदतीला घेतले
कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले की, आरोपीने अत्यंत क्रूरपणे या हत्याकांडाचे नियोजन केले होते. त्याने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीलाही मदतीला घेतले होते. गुन्ह्यात वापरलेले हत्यार, साहित्य आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. सध्या पोलिसांनी नंदी हिल्सजवळून केवळ ७ वर्षीय पुनीतचा मृतदेह हस्तगत केला असून, चार्मडी घाटासह इतर भागात उर्वरित ६ मृतदेहांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत
Read About: West Bengal Husband Kills Wife : मी सायको झालोय.. पत्नीची हत्या करून कापलेले शीर घेऊन मंदिरात बसला पती
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.